मुंबईत चाकूचा धाक दाखवून 22 लाख रुपये लुटले, पोलिसांनी तिघांना केलं अटक
Mumbai Crime News: मुंबईत एक व्यक्ती रिक्षामध्ये 22 लाख रुपयांची बॅग घेऊन प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना घडली आहे.
Mumbai Crime News: मुंबईत मागील काही दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मोगरा मेट्रोस्थानकाजवळ (jogeshwari metro station) रुपल प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कंपनी मॅनेजर रिक्षामध्ये 22 लाख रुपयांची बॅग घेऊन प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. लूटमार करणाऱ्या तीन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी मालवणी, विरार, ठाणे परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी केलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदकुमार कांबळी (30 वर्षे), सनी शशिकांत सुर्वे (28 वर्ष) आणि अभिषेक जयस्वाल (30 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) जोगेश्वरी पूर्वेकडील मोगरा मेट्रो स्थानकाजवळ 61 वर्षीय एक वृद्ध आपल्या कार्यालयातून घराकडे रिक्षाने जात असताना वाहतूक कोंडीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्या वृद्ध व्यक्तीकडील 22 लाख 19 हजार 600 इतकी रोख रक्कम असलेली बॅग हिसकावले आणि तो पळून गेला. यावेळी वृद्ध व्यक्ती आणि रिक्षा चालक याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शस्त्र काढल्यामुळे या दोघांचा प्रतिकार कमी पडला. त्यामुळे आरोपी रोख रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाला. याविषयीची तक्रार फिर्यादीने जोगेश्वरी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कलम 392 भादवि अन्वये नोंद करून तपासात सुरुवात केली.
जोगेश्वरी पोलिसांनी अधिकारी व अंमलदार यांचा समावेश असलेली वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला आहे. मात्र आरोपींनी आपली ओळख लपावी यासाठी बनावट नंबर प्लेट असलेल्या गाड्या तसेच डोक्यावर हेल्मेट वापरले. यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यास तपास पथकाला काहीशी अडचण आली. परंतु तपास पथकाने फिर्यादीचे कार्यालय तसेच प्रवास केलेला मार्ग, घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीच्या कार्यालयातील एका व्यक्ती आणि मालवणी परिसरातून दुसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता आर्थिक निकड असल्याने त्यांनी चारकोप मालवणी येथील एका साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबिल केले. यानंतर तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा:
शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, परभणी जिल्हा न्यायालयाचा निर्ण