शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, परभणी जिल्हा न्यायालयाचा निर्णय
Parbhani News Update : परभणी महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणाी आज सुनावणी घेतली.
Parbhani News Update : परभणी महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणात चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जवळपास पावणे चार वर्षांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चार जणांना जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. रवी गायकवाड, किरण डाके, मीनाक्षी रवी गायकवाड आणि पार्वती मोरे अशी शिक्षा सुनावलेल्या ओरोपींची नावे आहेत.
31 मार्च 2019 रोजी परभणी शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात नळाच्या पाण्यावरून नगरसेवक अमरदीप रोडे आणि त्यांचे मित्र रवी गायकवाड, किरण डाके यांच्यात वाद झाला होता. याच वादातून रवी गायकवाड आणि किरण डाके यांनी अमरदीप रोडे यांच्यावर कुऱ्हाड, तलवारीचे वार करत तसेच दगडाने ठेचून हत्या केली होती. या हत्येनंतर संशयितांनी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली देखील दिली होती. आज 3 वर्ष 10 महिन्यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी शिक्षा चार जणांना शिक्षा सुनावली. रवी गायकवाड आणि किरण डाके यांना कलम 302, 34 अन्वये दोषी ठरवत आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड. तर मीनाक्षी रवी गायकवाड आणि पार्वती मोरे यांना कलम 302,114 नुसार आजन्म सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
25 साक्षीदारांची साक्ष ठरली महत्वाची
अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात रोडे यांचे बंधू धम्मदीप रोडे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. सुभाष देशमुख यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाने त्यांची नियुक्ती या प्रकरणात केली होती. या प्रकरणात 25 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. ज्यात 7 आरोपी पैकी 3 जणांविरोधात गुन्हा सिद्ध झाला नसल्याने त्यांना निर्दोष मुक्त केले तर चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
जिल्हा न्यायालयाला छावणीचे स्वरूप
अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा आज निकाल लागणार असल्याने जिल्हा न्यायालय परिसरात चोख बंदोबस तैनात करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाच्या गेटपासून ते आतमध्ये सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. सुभाष उत्तमराव देशमुख (हट्टेकर ) यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक आर. रागसुध, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, सहाय्याक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भांगे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
महत्वाच्या बातम्या