केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना पसरला, भाई जगताप यांचं मोदींना प्रत्युत्तर
PM Modi : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने सर्व मर्यादा पार केल्या. देशभरात कोरोना पसरवण्यास काँग्रेसचं जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये केला होता.
![केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना पसरला, भाई जगताप यांचं मोदींना प्रत्युत्तर mumbai congress president Bhai Jagtap reaction on pm modi loksabha speech केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना पसरला, भाई जगताप यांचं मोदींना प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/24/d8cf2cb69ffa19e484ac85dd9672999c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhai Jagtap on PM Modi : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने सर्व मर्यादा पार केल्या. देशभरात कोरोना पसरवण्यास काँग्रेसचं जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये केला होता. या आरोपाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे. नाना पटोले आणि भाई जगताप यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना पसरल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, ‘आम्ही कोरोना काळात मुंबईत काम करणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहारच्या मजूरांना गावी जावेत यासाठी पैसे भरून ट्रेनने त्यांना पाठवलं. अनेक मजूर चालत आपल्या गावी जात होते, परंतु केंद्राने काहीच केलं नाही. आमच्यामुळे ते गावी व्यवस्थित जाऊ शकले, त्यानी हे लक्षात घ्यावं. किमान महाराष्ट्रात अनेक प्रेते वाहत जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही. कोरोना संकटाबाबत ज्यावेळी राहुल गांधी बोलत होते, त्यावेळी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी महारष्ट्र सरकार अंतर राष्ट्रीय विमाने बंद करण्याबाबत विनंती करत होते, त्यावेळी देखील यांनी दुर्लक्ष केलं. माझा स्पष्ट आरोप आहे की, केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना वाढीस लागला. केंद्र सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यामुळे कोरोना पसरला.'
Mumbai Congress is proud to have supported the common people who were in dire need of help during Covid. Left to PM Modi, millions would have died on the highways returning home on foot.
— Mumbai Congress (@INCMumbai) February 7, 2022
झूठ के पांव नहीं होते, मोदी जी।
और गरीब हिंदुस्तानी के लहू से सने पांव झूठ नहीं बोलते। https://t.co/YaL1Bf2QQw pic.twitter.com/euKYY1iFF4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, ‘कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे.’ मोदींनी स्थलांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसवर निशाणा साधला होता, याला प्रत्युत्तर देताना पटोले म्हणाले की, ‘रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता. रेल्वे तुम्हीच सुरु केलीत. उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आलं नाही, हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जातायेत.’ नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त वाटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशिलतेची हद्द पार केली आहे. आमच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप करत होते. पण नमस्ते ट्रम्प कोणी केलं. तबलिकी समाजाला अधिवेशन कोणी घ्यायला लावलं याची उत्तरं द्या, असेही पटोले म्हणाले.
मोदी काय म्हणाले होते? -
भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. पण कोरोना महामारीमध्येही विरोधकांनी राजकारण केलं आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली. कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांनी जिथं आहात तिथंच थांबा, असं म्हटलं होतं. पण काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. कोरोना लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर हद्दच केली, त्यांनी मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा असं ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगि
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)