एक्स्प्लोर

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, अमरावती कारागृहातून 4 तर नागपूरमधून 2 जणांची सुटका

11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे.

Mumbai bomb blast case : 11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील 3 कैदी नागपूर तुरुंगात होते. त्यापैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर त्यांना दोषमुक्त केलं आहे. तर नावेद हुसेन रशीद हुसेन खान याची जुन्या प्रकरणामुळे सुटका होणे बाकी आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून 4 कैद्यांची सुटका 

शिक्षा भोगत असताना या कैद्यांनी कारागृहात कायद्याचे शिक्षण घेतले होते. आज दोन कैद्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला कारागृहात आले होते.  दरम्यान, 11 पैकी 4 आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, महद मजीद महद शफी, सुहिल मोहम्मद शेख, जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख हे कैदी अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती करागृहातून देखील या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे. सर्व चारही आपले सामान घेऊन कारागृहा बाहेर आले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गुप्तता पाळली होती. 

मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्तता झालेला मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून  बाहेर आला आहे. निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सोडले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन आरोपी शिक्षा भोगत होते, त्यापैकी मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी हा पॅरोल वर सध्या बाहेर आहे. 

नेमकं प्रकरण काय?

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेत सात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली, तर 15 जणांना फरार घोषित करण्यात आले, ज्यांपैकी बरेच जण पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय होता. तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, 2015 मध्ये, ट्रायल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवले. यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget