एक्स्प्लोर

मोठी बातमी : आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट अपलोड होईल, नवी वेबसाईट सुरु!

शासनाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. त्यामुळे महिलांकडून घेतलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. यानंतर सरकारने

मुंबई: महायुती सरकारने  नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म (mukhyamantri mazi ladki bahin yojana) भरण्यासाठी राज्यभरातील महिलांनी महिलांनी प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कीही ठिकाणी सर्व्हर जाम, पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक संकेतस्थळ सुरू केले आहे 

सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करता येत होता. मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन, लोड आल्याने संकेतस्थळ बंद या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे  सरकारने नवे संकेतस्थळ  सुरू केले आहे.  महिलांना  आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट  भरता येणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता www.ladkibahin.maharashtra.gov.in  संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. 

31 ऑगस्ट 2024  पर्यंत अर्ज करावे, प्रशासनाचे आवाहन

या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या 21  ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024  पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?  

  • आधारकार्ड 
  • रेशनकार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • रहिवासी दाखला 
  • बँक पासबुक 
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचं प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा? 

योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल. 

           

हे ही वाचा :

राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी जाहीर केलेल्या योजनेचे पैसे किती महिने मिळणार? जाणून घ्या नियम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget