ST Workers Strike: एसटी विलीनीकरणावर मोठा निर्णय? समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर होणार
ST Workers Strike : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एसटी विलीनीकरणाबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
ST Workers Strike : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचा निर्णय आज होण्याची दाट शक्यता आहे. हायकोर्टाच्या निर्देशानंतर सरकारने स्थापन केलेल्या तीन सदस्यीस समितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे. या अहवालाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
जवळपास तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे आदींसह इतर मागण्यांवर संप पुकारला आहे. त्यापैकी विलीनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढवण्यात आले आहे.
एसटी विलीनीकरणाबाबत दाखल असलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत हायकोर्टात हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावेळी एसटी विलीनीकरणाबाबतच्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला नाही. त्यामुळे सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात सांगण्यात आले होते.
एसटी विलीनीकरणाबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
28 ऑक्टोबरला एसटी कर्मचऱ्यांचा संप सुरू झाला होता. राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीची वाहतूक गेल्या 100 दिवसांहून अधिक काळासाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपत सहभागी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेलला हा संप आहे
संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करणार नाही
एसटी संपामुळे महामंडळाचे (ST Mahamandal) कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha