एक्स्प्लोर

MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची महत्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं (MPSC) शुक्रवार महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही करण्यात येतआ आहे. 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं (MPSC) शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करिता उपस्थित उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतला आहे. देशात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही करण्यात येत आहे. 

उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 या परिक्षेच्या निकालापासून याची सुरुवात होणार आहे. देशात प्रथमच असा प्रयोग, यामुळे निकालात पारदर्शकता येणार असल्याचं बोललं जात आहे. गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना आपल्याला किती गुण मिळाले हे समजणार आहे.  

गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या  https://mpsc.gov.in संकेतस्थळावर Online Facilities मधील Marksheet या पर्यायामध्ये उपलब्ध असेल. कसं पाहाल...

आयोगाच्या संकेतस्थळावर जा

Online Facilities मधील Marksheet वर क्लिक करा...

उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबधित परीक्षेची निवड करा

परीक्षेच्या अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी टाकून लॉगइन करा

लॉग इन केल्यानंतर स्कॅन उत्तर पत्रिका आणि गुणपत्रक उपलब्ध करुन घेता येईल...

महत्वाचं... वरील प्रक्रियेस कोणतीही अडचण आल्यास आयोगाच्या 1800-1234-275 अथवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा supportonline@mpsc.gov.in या मेल आयडीवर कळवावे.  

दरम्यान, आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं घेतला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलेय. याशिवाय आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Umesh Patil Meets Sharad Pawar : उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?Maharashtra Assembly Election :  27 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारकVijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलंRahul Narvekar :  निवडणूक किती टप्प्यात घ्यायची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
solapur: मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
Sanjay Raut : विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
Embed widget