कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाची वाट लावली, नाव न घेता विनायक राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार
तळकोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे
सिंधुदुर्ग : तळकोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुर्दैवाने कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी दळभद्री आय.आर.बी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी अशा प्रकारचा ठेकेदार नियुक्त केला. तेच काम एम.आय.डी.सीने केलं असतं तर शिर्डी सारखा विमानतळ सुरू झाला असता.
माञ आय.आर.बीचे लाड पुरवण्यासाठी त्याला ठेकेदारी दिलं आणि संपूर्ण विमानतळाची वाट लावण्याचं काम केलं. आता मागे लागून ते काम आम्ही पुर्ण करून घेतोय. डि.जी.सी.एच्या सुचने प्रमाणे धावपट्टीचे काम झालं नाही म्हणून त्याला डि.जी.सी.एने लायसन दिलं नाही. माञ आता आय.आर.बीला शेवटची चेतावणी दिलेली आहे. आता जर डि.जी.सी.एच्या सुनेप्रमाणे धावपट्टीचं काम झालं नाही तर एम.आय.डी.सीला चिपी विमानतळ आपल्या ताब्यात घेण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. माञ कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड केली जाणार नसल्याचं म्हणत आय.आर.बीला शेवटचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाला अजूनही मुहूर्त सापडेना झाला आहे. सत्ताधाऱ्यानी अनेक वेळा तारखा देऊनही अध्याप विमानतळाला मुहूर्त सापडलेला नाही. आता तर खाजगी विकासकाला चिपी विमानतळाचे काम देण्यावरून राजकारण सुरू झालेलं पहायला मिळत आहे. स्वताला कोकणचे सम्राट म्हणवून घेणाऱ्यानी खाजगी विकासकाला चिपी विमानतळाचे काम देऊन वाट लावली अशी नाव न घेता विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका केली आहे. त्यामुळे कोकण वासीयांच स्वप्न सत्यात केव्हा येईल ते माहीत नाही मात्र त्यावरून कोकणात राजकारण मात्र जोरात सुरु झालं आहे. त्यामुळे चाकरमान्याना चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी अजूनही काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिपी विमानतळामुळे देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यला पर्यटनाला चालना मिळेल.
Pune Corona Vaccine: केंद्राकडून कोरोना लसींच्या बाबतीत पुण्याला विशेष ट्रीटमेंट, नेमकं सत्य काय?
DGCA च्या नियमांचे IRB या खाजगी विमानतळ विकासकाने उल्लंघन केलं असून DGCA ने ज्या पद्धतीने सुचवलं होतं, त्या पद्धतीने काम केलं नसल्याने DGCA ने लायसन्स दिलेलं नाही. आता महाराष्ट्र विमान प्राधिकरण, महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय विमान मंत्रालय यांनी IRB ला शेवटची चेतावणी दिलेली आहे. आता DGCA च्या निर्देशानुसार काम केलं नाही, तर विमानतळ ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सध्या चिपी विमानतळावरील धावपट्टी बाबत DGCA ने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटी दुरुस्त करण्याचं काम IRB करत आहे. यासाठी साधारणपणे १ महिना लागण्याची शक्यता आहे. IRB ला DGCA लायसन्स मिळाल्याशिवाय चिपी विमानतळ सुरू होणार नाही.
चिपी विमानतळाचे काम सुरू करताना जिल्ह्याचा कारभार पाहणारे कोकणचे सम्राट म्हणणारे त्यांनी IRB सारखा दळभद्री कंत्राटदार नियुक्त केला. नाहीतर हेच काम MIDC ने केलं असत तर शिर्डी सारख विमानतळ सुरू झालं असत. खाजगी विकासक IRB चे लाड पुरवण्यासाठी त्याला कंत्राट दिल आणि संपूर्ण विमानतळाची वाट लावण्याचं काम केलं. जर DGCA च्या निर्देशानुसार धावपट्टीचं काम झालं नाही तर MIDC चिपी विमानतळ आपल्या ताब्यात घेईल असा इशारा IRB ला खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.