एक्स्प्लोर

Supriya Sule on Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 

Supriya Sule on Devendra Fadnavis : भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचं नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

मुंबई : महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 26/11 भारतातील नवे तर जग काळा दिवस म्हणून बघतं. या योद्धांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी योगदान दिलं. 26/11 जग कधीच विसरणार नाही. 

माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो

अंतरवाली सराटीमधील दगडफेकीतील संशयित आरोपी ऋषीकेश बेदरेला अटक करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत शरद पवार गटावर टीका केली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नितेश राणेंनी केलेला आरोप मी पाहिलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहे, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, एखादा आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचं अपयश गृह विभागाचं आहे. 

नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे

मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही, भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचं नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचं अपयश आहे. 

माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या भीषण असून मी त्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होत असेल तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे. सगळ्यांत मोठं आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांच लक्ष दूर करत आहे. 

भाजप आता जूमला पार्टी 

दुष्काळ,महागाई,बेरोजगारी या भीषण समस्या आहेत. दूध महाग झालं आहे, कांदा प्रश्न बिकट झाला आहे, शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत आहे. दिल्ली सरकार आता भ्रष्ट जुमला भाजप सरकार आहे. वाजपेयी, सुषमा स्वराज यांची ओरिजिनल सुसंस्कृत भाजप आता जूमला पार्टी झाला असल्याची कडवट टीका त्यांनी केली. या देशात बाळासाहेब ठाकरे एकच होऊन गेले, त्यांच्या नावाच्या उपाध्या कोणी घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवरून लगावला. प्रकाश आंबडकर या देशाचे एक मोठे नेते, ते इंडिया आघाडीत आल्यास त्यांचं स्वागत असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget