Lok Sabha : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! राज्यात भाजप लोकसभेच्या 26 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 22 जागा लढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर (Winter Assembly Session) फुटणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
Maharashtra Politics: शिवसेना (Shiv Sena ), राष्ट्रवादीतील (NCP) बंडानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharshtra Political Updates) अभूतपूर्व कलाटणी मिळाली.आगामी लोकसभेसाठी (Loksabha Election) महायुतीचं (Mahayuti) जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजप (BJP) लोकसभेच्या 26 जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी 22 जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित करण्यात आले आहे. प्रस्तावित जागांवर चर्चा झाल्यानंतरच होणार अंतिम निर्णय आहे. महायुतीच्या जागा वाटपावर लवकरच होणार चर्चा आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या मतदारसंघाचा सर्व्हेक्षण झाले असून मतदारसंघात कोणत्या उमेदवाराल मतदारांची पंसती आहे याचे कल हाती आले आहे.आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. 2019 साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.
हिवाळी अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटणार
फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर (Winter Assembly Session) फुटणार आहे. नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. जर एखाद्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या उमेदवाराचा आपल्या पक्षाचा उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करतील. हा नियम भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल.
देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा 40 ते 42 जागांवर निश्चित आहे. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पाठिशी आहे. 2019 च्या निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीत भाजपच्या कामगिरी बदल झालेला असेल, असे देखील फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असावा ही कार्यकर्त्यांची मागणी, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे गटाची धाकधूक वाढली