एक्स्प्लोर
हिंगोलीत पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या करुन आईचा गळफास
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सवना गावात अत्यंत खलबळजनक घटना घडली. 26 वर्षे महिलेने पोटच्या दोन चिमुकलींची गळा दाबून हत्या केली आणि स्वत: गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
नांदेड जिल्ह्यातील चिकाळा येथील आरती नायक हिचा विवाह 4 वर्षांपूवी सवना येथील प्रवीण नायक यांच्यासोबत झाला होता, त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या.
काल संध्याकाळी गावात महाप्रसाद असल्यामुळे घरातील सर्व जण बाहेर गेले होते. घरात फक्त आरती व तिच्या दोन मुलीचं होत्या. घरातील मंडळी परत आल्यावर त्यांना आरतीने फाशी घातल्याचे निदर्शनास आले, तर बाजूला दोन्ही मुले मृत अवस्थेत आढळून आल्या. गोरेगाव पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनस्थली धाव घेतली.
आरतीला दोन्ही मुली असल्याने सासरच्या मंडळींनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळेच आरतीने टोकाचं पाऊल उचललं, अशी तक्रार आरतीच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांकडे केली आहे.
माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपअधीक्,क सिद्धेश्वर भेर यांनी याबाबत माहिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement