Morning Headlines 15 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; शपथविधीनंतर पहिल्यांदाच अजित पवार थोरल्या पवारांच्या निवासस्थानी
Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) समीकरणंच बदलली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर तब्बल 13 दिवसांनी मंत्र्यांचं खातेवाटप झालं. वाचा सविस्तर
2. Rafale M Deal : चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारतच समुद्राचा खरा 'बादशाह', नौदलात सामील होणार 26 राफेल-एम
Rafale M Deal : चिनी ड्रॅगन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) झोप उडणार आहे. कारण आता भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. लवकरच 26 सागरी लढाऊ विमानं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वाचा सविस्तर
3. Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार? इस्रोच्या प्रमुखांनी सांगितली तारीख; कसा असेल चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास?
Chandrayaan 3 Journey : इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेला सुरुवात झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील माहिती गोळा करणं ही आहे. वाचा सविस्तर
4. PM Modi : दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरीसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल
PM Modi in France: दहशतवादाच्या (terrorism) विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. ते फ्रान्समध्ये बोलत होते. वाचा सविस्तर
5. PM Modi UAE Visit : दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE साठी रवाना, राष्ट्रपती शेख बिन जायद यांची घेणार भेट
PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर (PM Modi France Visit) युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत. वाचा सविस्तर
6. Seema Haider : पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर पाक सैन्य दलातील अधिकारी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Seema Haider News : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फार चर्चेत आहे. दोघांची पबजी गेमवर ओळख झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा घरदार सोडून भारतात आली. वाचा सविस्तर
7. Rain Update : उत्तर भारताला पुराचा मोठा फटका, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट; हिमाचल प्रदेशला 180 कोटी रुपयांची मदत जाहीर
Rain Update: सध्या उत्तर भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. वाचा सविस्तर
8. 15th July In History: मुंबईत 'बेस्ट'ची पहिली बस धावली, बालगंधर्व यांचे निधन; आज इतिहासात
15th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवसाचे ही महत्त्व आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाने छाप सोडणारे बालगंधर्व यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर
9. Horoscope Today : मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य
Horoscope Today 15 July 2023 : आज वार शनिवार दिनांक 15 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर