एक्स्प्लोर

Morning Headlines 3rd April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Chhatrapati Sambhaji Nagar Fire : एक चार्जिंग सॉकेट अन् पूर्ण घरात आग, संपूर्ण सात लोकांचं कुटुंब जागीच जळून खाक; संभाजीनगरच्या आगीच्या घटनेत नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Naga City) छावणी परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ असलेल्या तीन मजली ईमारतमध्ये असलेल्या कपड्याच्या दुकानाला आग (Fire) लागल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात दोन पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, तपास करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आता आग कशी लागली याचा तपास देखील केला जात असून, काही प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे. वाचा सविस्तर...

Weather Update : उकाडा वाढला! पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट, आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता

Weather Update Today : राज्यासह देशात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी (Unseasonal Rain) लावली. एप्रिल सुरु होताच मात्र उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमालयीन प्रदेशासह देशाच्या वायव्य भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

Sharad Pawar Group : शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होणार; सातारा, माढामधून रिंगणात कोण?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar 2nd List For Lok Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार शिवबंधन बांधणार? उन्मेष पाटील आज ठाकरे गटात सामील होण्याची शक्यता

मुंबई : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटात प्रवेश (UBT Shivsena) करणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 12 वाजता उन्मेष पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. वाचा सविस्तर...

"जो में बोलता हु, वो करके दिखाता हु"; जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

Ashok Chavan in Lok Sabha Election : नांदेड : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपची (BJP) साथ दिली. सध्या भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यापासूनच प्रचार सभांचं आयोजन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं. याच सभेत जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं, असं वक्तव्य करुन अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना, शिवसेना नेली पण टिकवण्याचं मोठं आव्हान : संजय जाधव

परभणी : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना' अशी झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) घेऊन गेले मात्र टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना अशी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसलेला पैलवान भाजपवाल्यांना कधीही लुडबूड करू दिली नाही. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांची भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. वाचा सविस्तर...

ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?

Mumbai Indians Hardik Pandya Marathi News: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग तिसरा पराभव झाला. 1 मार्चला झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. वाचा सविस्तर...

Horoscope 2nd April 2024:  मंगळवारी ‘या’ राशींवर दिसेल गणपतीची कृपा, महिलांना परिश्रमातून मिळेल यश; 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope 2nd April 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget