(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दीड लाखहून अधिक साखर कामगार संपावर जाणार, ऊसाच्या गळीत हंगामासमोर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
का बाजूला ऊस दरासाठी शेतकरी संघटना (Shetkari Sanghtana) आंदोलनाच्या तयारीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला साखर कामगारांनीही (sugar workers) वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय.
Sugar workers News : एका बाजूला ऊस दरासाठी शेतकरी संघटना (Shetkari Sanghtana) आंदोलनाच्या तयारीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला साखर कामगारांनीही (sugar workers) वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐन ऊस गळीत हंगामातचं (Sugarcane harvesting season) राज्यातील सुमारे दीड लाखहून अधिक साखर कामगारांनी संपाच हत्यार उपसलं आहे.
साखर कामगारांचा वेतनवाढ करार रखडला
साखर कामगारांचा वेतनवाढ करार रखडला आहे. कामगारांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे 2 लाख साखर कामगार 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबतची माहिती साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.
साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न काय आहेत
1) साखर कामगारांचे थकित वेतन त्वरीत देण्यात यावेत.
2) साखर कामगारांच्या पगारवाढी बाबतचे करार व त्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.
3) कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी शरद पवार यांनी लक्ष घालून पेन्शन वाढीसाठी मदत करावी.
4) कायम कामगार सेवा निवृत्त होताना त्याला मिळणारऱ्या ग्र्यॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी म्हणजेच एक वर्षाला कायम कामगारांना पंधरा दिवसा ऐवजी एक महिन्याच्या पगार व हंगामी कामगारांना सात दिवसा ऐवजी पंधरा दिवसांचा पगार ग्र्यॅज्युटी म्हणून देण्यात यावा.
5) अनाठायी नोकरी भरती टाळण्यासाठी आकृतीबंध तयार करुन, पगारामध्ये नियमितता आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
सध्या राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अडचणीत सापडलेले साखर कारखाने व त्यामुळे अडचणीत आलेले साखर कामगार यांना बाहेर काढणं गरजेचे असल्याची माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : साखर कामगारांचे नेमके प्रश्न काय? त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्याची शरद पवारांची सूचना