Raj Thackeray : "महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे"; शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी
MNS : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
![Raj Thackeray : MNS Chief Raj Thackeray Gudi Padwa melava future Chief Minister of Maharashtra banner by MNS in Shivaji Park area Raj Thackeray :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/c37f946a31790caa5d904438e169c8cc167945204614489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे.. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता. याआधी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. पण आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.
सौदीत मशिदीवरील भोंगे बंद होतात मग महाराष्ट्रात भोंगे बंद का होत नाही? राज ठाकरेंचा सवाल
दरम्यान उद्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीत मशिदीवरील भोंग्यांवरुन सरकारला सवाल केला आहे. सौदीत मशिदीवरील भोंगे बंद होतात मग महाराष्ट्रात भोंगे बंद का होत नाही असं राज ठाकरे म्हणाले. लोकमान्य सेवासंघ, पारले शतकपूर्ती सोहळ्यात आज राज ठाकरेंची मुलाखत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते या मुलाखतीत वर्तमानपत्र काढण्याची इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
कोणाचे वाभाडे काढायचे, हे सगळं मी सभेत बोलणार
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. या सभेत राज ठाकरे काय बोलतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)