एक्स्प्लोर

Shahajibapu Patil: अजितदादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा, शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी 

दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे म्हणत सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू  पाटील (Shahajibapu Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला.

Shahajibapu Patil :  अजितदादांना पहाटे जाऊन शपथ घ्यायची सवय लागली आहे. त्यामुळं पहाटे जाऊन शपथ घेतल्यावर सरकार पडेल असं त्यांना वाटतंय. पण दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे म्हणत सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू  पाटील (Shahajibapu Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचेही पवार पाटील म्हणाले. शिवतीर्थावर काय शिवसेनेचा (Shivsena) मेळावा आहे वाटले का? तिथे तर राष्ट्रवादीचाच मेळावा असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळालं.  दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे पाटील म्हणाले. दसरा मेळाव्याच्या मुद्यावरुन देखील शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवतिर्थावर गर्दी ही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले. मात्र खरे वाघाच्या अवलादी असणारे शिवसैनिक बिकेसी मौदानावर असतील असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. 

अडीच वर्षापूर्वीच जे घडायचे होते, ते थोडे उशीरा घडले

अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. पण त्यांच्या दबावाला कोणताही अधिकारी आता बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. दसरा मेळाव्याला गर्दी ही राष्ट्रवादी काँग्रेसची असणार आहे. खरे शिवसैनिक बिकेसी मैदानावर असणार आहेत. मुंबईची जनता ही सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यामुळं ते भांबावून गेले आहेत. त्यामुळं चिडून ते सगळा प्रकार करत आहेत. अडीच वर्षापूर्वीच जे घडायचे होते, ते थोडे उशीरा घडले असल्याचे पाटील म्हणाले. आमचं सरकार चांगलं काम करत असल्याचे पाटील म्हणाले. 

दसरा मेळाव्याची आमची तयारी पूर्ण

आमची दसरा मेळाव्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. तयारी करणं म्हणजे फक्त व्यासपीठ तयार करणे एवढचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं मनापासून स्विकारले आहे. त्यामुळं दसरा मेळाव्याला जनता अलोट गर्दी करेल असा विश्वास आहे. ही जनता शिंदे साहेबांना आशिर्वाद देईल आणि 100 टक्के कार्यक्रम ओके होईल असेही शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget