Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर नितेश राणेंचं जुनं ट्वीट व्हायरल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर आमदार नितेश राणे यांचे एक जुने ट्वीट व्हायरल झाले आहे.
![Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर नितेश राणेंचं जुनं ट्वीट व्हायरल MLA nitesh ranes old tweet about chaturvedi went viral after ED took action over uddhav thackerays brother in law Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर नितेश राणेंचं जुनं ट्वीट व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/05/5da543cc0da7b35f0b772987672ff82b_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitesh Rane Viral Tweet : ई़डीने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पुष्पक बुलियनशी संबधित नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांची नावं आहेत. दरम्यान याच चतुर्वेदीबाबत राणे यांनी काही महिन्यांपूर्वी ट्वीट करत तो फरार असून आदित्य ठाकरे यांचाही चतुर्वेदीशी संबंध असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
नितेश राणे यांनी 9 सप्टेंबर, 2021 रोजी हे ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'नंदकिशोर चतुर्वेदी जो अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहे म्हणजेच फरार आहे. त्यात त्याच्या कंपनीत आदित्य ठाकरे यांचीही गुंतवणूक असल्याने त्यांच्यावरही पुणे क्राईम ब्रांचने लक्ष ठेवायला हवं, असं म्हटलं आहे.
काय आहे ईडीची कारवाई?
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
हे ही वाचा
- न्यायालयावर दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- Maharashtra: घोटाळेबाजांना सोडणार नाही! उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt][/yt]
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)