Bacchu Kadu On Pankaja Munde : ...म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त; बच्चू कडूंचा मोठा आरोप
Bacchu Kadu: पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी मोठा आरोप केला आहे.
![Bacchu Kadu On Pankaja Munde : ...म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त; बच्चू कडूंचा मोठा आरोप MLA Bacchu Kadu Reaction on GST officials raid on BJP leader Pankaja Munde Sugar factory in Beed Bacchu Kadu On Pankaja Munde : ...म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त; बच्चू कडूंचा मोठा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/0c3016899d04d270b6583b4f8be515141676967858672440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bacchu Kadu On Pankaja Munde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रात फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं म्हणत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठा आरोप केला आहे. दरम्यान, रविवारी (24 सप्टेंबर) पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागानं मोठा दणका देत त्यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanth Sakhar Kharkhana) तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भात एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू यांनी मोठा आरोप केला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, "पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं."
रोहित पवार भविष्य करतात याचं मला नवल वाटतं :बच्चू कडू
रोहित पवार भविष्य करतायत, याचंच मला नवल वाटतं. कारण तसेही ते भविष्याच्या विरोधात असतात. त्यांनी कोणाला विचारलं ते पाहावं लागेल, असं म्हणत बच्चू कडू यांनी रोहित पवारांनी केलेल्या भाकीतावरही खोचक टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर जीएसटी विभागानं कारवाई का केली?
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात देखील छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. कारखान्याची कोणती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे याची माहिती असलेले एक पत्रक कारखान्याच्या गेटवर जीएसटी विभागाकडून लावण्यात आले आहे. त्यानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याचं हे देखील जीएसटी विभागाने म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना बच्चू कडू यांनी थेट आरोप केलेत; पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)