एक्स्प्लोर
नाना कहा आना? नेते-आमदारांकडून हरीभाऊ बागडेंची शोधाशोध
अधिवेशन असलं की विधानसभा अध्यक्षांना अधिक महत्त्व असतं, पण सध्या कुठलंही अधिवेशन नाही तरीदेखील विधासभा अध्यक्षांना (हरीभाऊ बागडे) खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.
औरंगाबाद : अधिवेशन असलं की विधानसभा अध्यक्षांना अधिक महत्त्व असतं, पण सध्या कुठलंही अधिवेशन नाही तरीदेखील विधानसभा अध्यक्षांना (हरीभाऊ बागडे) खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. अनेक पक्षांचे नेते आणि आमदार हरीभाऊंचा शोध घेत आहेत. विमानतळ असो, नागपूर असो, मुंबई असो किंवा एखादी प्रचारसभा. सर्वजण त्यांना विचारतात "नाना कहा आना?" (नाना राजीनामा द्यायचा आहे, कुठे येऊ?)राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात हरीभाऊ यांच्या नावावर राजीनामे घेण्याचा आणि मंजूर करण्याचा इतिहास झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचे फोन विधानसभा अध्यक्षांना येतात आणि हाच प्रश्न विचारला जातो 'नाना कहा आना?' लोकसभा निवडणुका लागल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या नावावर राजीनामे घेणे आणि ते मंजूर करण्याचा नवा रेकॉर्ड झाला आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आत्तापर्यंत हरीभाऊंनी तब्बल 26 आमदारांचे राजीनामे मंजूर केले आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष प्रचारादरम्यान आपल्या मतदारसंघांमध्ये फिरत आहेत. शिवसेना आणि भाजप नेते नानांना (हरीभाऊंना) शोधत असतात. कोणी आमदार हरीभाऊ यांना भरसभेत व्यासपीठावर राजीनामा देतो, कोणी त्यांना विमानतळावर पकडतो, कोणी नागपुरात, कोणी मुंबईत, तर कोणी त्यांच्या राहत्या घरी जाऊन राजीनामा देतो.
यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे कोणता आमदार राजीनामा देणार आहे, याची माहिती शिवसेनेचे नेते देत नाहीत, भाजपचे नेतेदेखील तसंच करतात, असा अनुभव असल्याचे स्वतः हरीभाऊंनी सांगितले.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये मेगाभरती सुरु आहे. शिवसेनेने तर आमदारांचे राजीनामे हरीभाऊपर्यंत पोहोचवण्यासाठी एक स्पेशल विमान ठेवलंय की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण भास्कर जाधव, भाऊसाहेब कांबळे हे आमदार स्पेशल विमानांनी हरीभाऊंकडे आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडेसुद्धा राजीनामा स्वीकारण्यासाठी तत्परता दाखवत आहेत. वेळप्रसंगी ते मोटारसायकलने प्रवास करतात.
आतापर्यंतच्या इतिहासात हरिभाऊ बागडे यांच्या नावावर राजीनामे स्वीकारणे आणि ते मंजूर करण्याचा रेकॉर्ड मात्र झाला आहे. त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष बरोबरच हरीभाऊ बागडे यांना राजीनामा अध्यक्ष म्हणून देखील इतिहासात ओळखले जाईल, असे म्हटले जात आहे.
व्हिडीओ पाहा
या आमदारांनी राजीनामे दिले
- आमदार अनिल गोटे आणि आमदार आशिष देशमुख यांनी पक्षावरील नाराजीमुळे राजीनामा दिला
- हेमंत पाटील, गिरीश बापट, बाळू धानोरकर आणि इम्तियाज जलील या आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला
- हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला
- तर 19 आमदारांनी शिवसेना आणि भाजप प्रवेशासाठी राजीनामा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement