शिवराज्याभिषेक बंद करा म्हणणारा पिसाळलाय, त्याची तात्काळ नसबंदी करा, मिटकरींचा नाव न घेता संभाजी भिडेंना टोला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी शिवराज्याभिषेकाच्या मुद्यावरुन नाव न घेता संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी शिवराज्याभिषेकाच्या मुद्यावरुन नाव न घेता संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जहरी टीका केली आहे. मिटकरी यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे. 6 जूनचा शिवराज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे, त्यामुळं तात्काळ त्याची नसबंदी करं हिताचं आहे, असं वक्तव्य मिटकरी यांनी केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत नाव न घेता संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. 6 जूनचा शिवराज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे. एकदा कुणी पिसाळला तर त्याची तात्काळ नसबंदी करणे समयसंमत व समाज हिताचे आहे. तसे न केल्यास पिसाळलेली विकृती चावत सुटते. खबरदारी म्हणून सरकारने तात्काळ दखल घ्यावी , असे मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी हे ट्वीट केल्यानंतर काही वेळाने लगेच हे ट्वीट डिलीट देखील केलं आहे. सध्या त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हे ट्वीट दिसत नाही.

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे?
रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. संभाजी यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेकावर भाष्य केले होते. संभाजी भिडे म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, असे विधान भिडे यांनी केले. या कुत्र्याचं राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भिडे यांनी केली. रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या श्वानाबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी माहिती दिली आहे. रायगडावरील वाघ्या या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी याआधी शिवप्रेमींनीही केली आहे. मात्र ही समाधी हटवण्यात आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून ही समाधी कपोलकल्पित असून ती हटवावी अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sambhaji Bhide and NCP Sharad Pawar : संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून जीवितास धोका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पोलिसांत धाव
























