राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत
केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला. मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता.युजीसी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का? असा सवालही त्यांनी केला.
![राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत Minister Uday samant On Final Year Exam In Maharashtra Exam Latest Update राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/02031042/uday-samat.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलुगुरूंशी चर्चा केल्यानंतर आज पुन्हा एकदा कुलगुरू समितीची बैठक सुरु आहे. यामध्ये परीक्षा कधी घेण्यात याव्यात ? त्या कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात ? या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात असून या बैठकीतील निर्णयाचा अहवाल तयार करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय परिक्षेबाबत घेतला जाणार आहे. साधारणपणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करू, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
कालच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीमध्ये असतील. आज ही समिती पुन्हा एकदा या परिक्षांबाबत बैठक घेत असून काही महाविद्यालयातील प्राचार्यांशी सुद्धा याबाबत सूचना घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर एक अहवाल ही समिती तयार करणार असून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चाकरून निर्णय घेतला जाईल.
परिक्षेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या बैठकीत नेमकी कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा होणार ? अंतिम वर्षाच्या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील? 30 सप्टेंबर आधी की 30 सप्टेंबर नंतर या परीक्षा घेतल्या जाव्यात? परीक्षा दोन टप्यात म्हणजेच सुरवातीला 30 सप्टेंबर आधी परदेशात शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आणि 30 सप्टेंबरनंतर इतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाऊ शकते का ? परीक्षा कशा पद्धतीने घेतली जावी ? ऑनलाइन, ऑफलाइन, ओपन बुक ? परीक्षा सरळ साध्या सोप्या पद्धतीने कशी घेतली जाईल ? राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी एकच सूत्र कसे तयार करता येईल ? कमी वेळेत आणि सर्व उपाययोजना करून परीक्षा कशा घेतल्या जाणार ? या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
शिवाय, शिक्षण तज्ज्ञ आणि राज्यातील माजी कुलगुरू यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन या परिक्षांबावत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. या परिस्थितीत परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे 40 ते 60 दिवस तयारीला लागत असल्याने तसा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिला जाणार असून विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नसक्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या अनलाॅक गाईड लाईन्सवर उदय सामंतांचा हल्लाबोल
केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला. युजीसी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का? असा सवालही त्यांनी केला. मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता. युजीसीचे सचिव बोलतात रजनीशजी घरी प्रश्न पत्रिका सोडावायला हरकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही अमंलबजावणी करतोय. विद्यार्थ्यांना सेंटरवर न आणता परीक्षा घ्याव्या, पण हे कसं शक्य आहे? असंही सामंत म्हणाले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)