एक्स्प्लोर

Ramdas Athawale : उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही, त्यांनी सत्ता सोडावी : रामदास आठवले 

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळं आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

Ramdas Athawale on CM Uddhav Thackeray : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळं आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नसल्यानं त्यांनी राजीनामा देऊन सत्ता सोडायला पाहिजे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

राज्यसभेत झालेल्या पराभवामुळं महाविकास आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. त्यांनी राजीनामा देऊन सत्ता सोडायला पाहिजे. राज्यसभेत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला तसाच पराभव 2024 च्या  निवडणुकीत देखील होणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि आम्ही एकत्रित निवडणुक लढवून विजय मिळवणार असल्याचंही  रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर आठवले हे सांत्वनपर भेटीसाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा (Sanjay Pawar) पराभव केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.या सहाव्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये महाडिकांनी बाजी मारली. 

राज्यसभेचे विजयी उमेदवार  

1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 41
6. धनंजय महाडिक- भाजप - 41

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget