एक्स्प्लोर

Abdul Sattar : अमोल हा अनमोल नाही तर बेमोल, अब्दुल सत्तारांचा मिटकरींसह सचिन सावंतांवर हल्लाबोल

अमोल हा अनमोल नाही बेमोल आहे, त्याची चर्चा आपण करावी एवढा तो मोठा नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे.

Abdul Sattar on Amol Mitkari : अमोल हा अनमोल नाही बेमोल आहे, त्याची चर्चा आपण करावी एवढा तो मोठा नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. तसेच जे लोक हँग झाले आहेत ते टीका करण्याचं काम करत असल्याचे ते म्हणाले. अब्दुल सत्तार हे  परभणी दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा चांगलाच समाचार घेतला.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारु पिता का? असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच यावरुन अमोल मिटकरी यांनी देखील सत्तार यांच्यावर टीका केली होती. सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर अब्दुल सत्तार यांनी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. 

त्यांच्याकडे काहीच काम उरलं नाही, सत्तारांचा विरोधकांवर निशाणा

आम्ही जेव्हा राज्यात फिरत असतो तेव्हा कुठे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर बसल्यानंतर हसी मजाक करत असतो. आता हसी मजाकमध्ये केलेली गोष्टसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही पोस्ट करुन व्हायरल करायचं काम हँग झालेले लोक करत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांच्याकडे काहीच काम उरलेले नाही, त्यामुळं त्यांना ते करु द्या, असे प्रत्युत्तर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना दिलं. एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनाही त्यांनी चोख प्रतिउत्तर दिलं. अमोल हे काय अनमोल नाहीत ते बेमोल आहेत. त्यामुळं त्या त्यांची चर्चा करावी एवढे ते मोठे नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले होते सत्तार

गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा देत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं. आता हाच व्हिडिओ सचिन सावंत यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं दारु पिता का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget