मोठी बातमी! मनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू, येत्या 10 दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार, सत्तारांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे आता राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं.
Abdul Sattar : मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं. मनोज जरांगे यांच्या मागण्याचा महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) गंभीर विचार करत आहे. येत्या 10 दिवसात या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं मोठं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.
ओबीसीवर अन्याय करा असे मी काही म्हटलो नाही
मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याचं मी स्वागत केलं आहे. पण काही चिल्लर लोक खडखड करत आहे. मी आजही आपल्या शब्दावर ठाम असून, मनोज जरांगे यांनी केलेल्या निर्णयाचे स्वागतच करतो असे जरांगे पाटील म्हणाले. कुणात दम असेल तर या समोर या असंही सत्तार म्हणाले. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण द्यावे, अशी मी माझी मागणी होती. ओबीसीवर अन्याय करा असे मी काही म्हटलो नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.
आमच्या सरकारमध्ये मुस्लिम समाजाला मोठा निधी मिळाला
मनोज जरांगे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात असेही जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकार असताना देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही. तेवढा आमच्या सरकारमध्ये मिळाला असेही सत्तार म्हणाले.
प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो
मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला न्याय मिळेल. प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो. आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करत असल्याचे सत्तार म्हणाले. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी दोनदा बोललो आहे. देशभरात अनेक मतदारसंघात मुस्लिमांचा विरोधात मतदान झालं आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये मला जे काही बोलायचं आहे, ते मी बोलत असतो असेही सत्तार म्हणाले. मुस्लिमांची एकी पाहायचे असेल तर लोकांनी निवडणुकीत लाईन लावून मतदान केलं. माझ्या सारखे दोन चार टक्के नसेल गेले, पण एखाद्या दिवशी मी देखील त्या लाईनमध्ये जाईल असेही सत्तार म्हणाले.
पिक विमा देताना ज्यादा पैसे घेतले तर कारवाई होणार
एक रुपयात पिक विमा देण्यात येत आहे. असे असताना कोणी ज्यादा पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले. दरम्यान, आज फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हवा आहे. मी पैलवान आहे. कोणासोबत तरी लढायचं आहे असेही सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय