एक्स्प्लोर
म्हाडाच्या 3 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी !

मुंबई : म्हाडाच्या घराची संधी यावेळी हुकली असली, तरी काहीच महिन्यात पुन्हा संधी मिळणार आहे. कारण म्हाडा तब्बल 3 हजार घरांसाठी पुन्हा लॉटरी काढणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात ही लॉटरी निघेल. कालच म्हाडाच्या 972 घरांसाठीची सोडत जाहीर झाली. मुंबईतील विविध भागात 972 जणांना घरं मिळाली. या लॉटरीनंतरच म्हाडाने पुढील वर्षीच्या लॉटरीची घोषणा केली. गिरणी कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी ही घरं असतील. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांसाठीची सोडत स्वंतत्रपणे काढण्यात येतील. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा हक्काचं घर मिळवण्याची संधी, म्हाडा उपलब्ध करुन देणार आहे.
संबंधित बातम्या
आर्ची आणि परशाला घर देणाऱ्या सुमन आक्काला म्हाडाचं घर
अभिनेत्री हेमांगी कवी, सुहास परांजपेला म्हाडाची लॉटरी
आणखी वाचा























