एक्स्प्लोर

मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार; राज ठाकरेंचा इशारा

संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे.

मुंबई : संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले, तसेच लोकांना शांत न बसण्याचे आवाहनही केले. यावेळी राज ठाकरे मुंबईकरांना उद्देशून म्हणाले की, मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार आहे. माझा विकासाला विरोध नाही, कधीही विरोध नव्हता, परंतु मुंबईतली मेट्रो मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे. प्रभादेवी येथील मनसेच्या प्रचारसभेत राज बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, शहरातली गर्दी बाहेर जावी अथवा कमी व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ते सोडून इथलं सरकार मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांसाठी मेट्रोसारखे विविध प्रकल्प सुरु करत आहे. त्यासाठी सत्ताधारी भूमिपूत्रांना चिरडण्याचं काम करत आहेत. त्यांना मुंबईबाहेर काढलं जात आहे. राज ठाकरे म्हणाले की, इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्याउलट हे सरकार इथल्या भूमिपुत्रांना, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईबाहेर काढत आहेत. इथल्या जमिनी बळकावल्या जात आहेत. सत्ताधारी या जमिनी बिल्डरांच्या घशात घालत आहेत. असे असूनही तुम्ही सर्वजण शांत का? सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मुंबईतल्या मराठी पट्ट्यातल्या तरुणांना मुंबईबाहेर जावं लागत आहे. मराठी पट्ट्यातले मराठी भाषिक मुंबईबाहेर फेकले गेल्याने इथली भाषा बदलू लागली आहे. त्याचं उदाहरण देताना राज म्हणाले की, शिवाजी पार्कच्या आसपास फेरी मारताना मराठी भाषेऐवजी इतर भाषा कानावर पडतात, तेव्हा वाईट वाटतं. राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली. राज म्हणाले की, मेट्रोसाठी रातोरात आरे कॉलनीमधील तब्बल 2700 झाडं तोडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की, आम्ही आरेला जंगल घोषित करु. पण तिथे झाडंच नसतील तर जंगल कसं घोषित करणार. पक्षप्रमुख तिथे गवत लावण्यापासून सुरुवात करणार का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget