Maharashtra Measles Outbreak : मुंबई, ठाण्यापाठोपाठ भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा शिरकाव; राज्य सरकारने कंबर कसली
Maharashtra Measles Outbreak : मुंबई, ठाणे आणि भिवंडीतही बालकांना मोठ्या प्रमाणात गोवरची लागण झाली. सोबतच मालेगावात रुग्णसंख्या आढळल्यानंतर आता नाशिकमध्येही गोवरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीची बैठक बोलवण्यात आली होती.
Maharashtra Measles Outbreak : मुंबईत गोवर आजाराचा (Mumbai Measles Disease) उद्रेक झाल्यानंतर ठाणे आणि भिवंडीतही बालकांना मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच नाशिक जिल्ह्यातील मालेगावात रुग्णसंख्या आढळल्यानंतर आता नाशिकमध्येही गोवरचा (Measles) शिरकाव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. ज्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी गोवर उद्रेकासंबंधी आढावा घेतला. सोबतच कस्तुरबा रुग्णालयात जाऊन त्यांनी बालकांवर सुरु असलेल्या उपचारासंबंधी माहिती देखील घेतली. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) सतर्क झालं असून उपाययोजना सुरु करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे.
गोवरचा उद्रेक, चिंतेत भर!
- मुंबईत आतापर्यंत एकूण 208 जणांना गोवरची लागण
- मुंबईनंतर आता ठाण्यात सुद्धा एक ते सहा वयोगटातील 12 गोवर संशयित रुग्ण आढळले आहेत
- मागील 4 दिवसापासून ठाण्यातील मुंब्रा, कौसा या भागात ठाणे पालिकेकडून गोवर लसीकरणसंदर्भात सर्वेक्षण केले जात आहे
- 12 मुलांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय
- भिवंडी, मालेगाव आणि मुंबई गोवरच्या आजाराचे हॉटस्पॉट झाले आहेत
- भिवंडीत 44 जणांना गोवरची लागण झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे
- तर भिवंडीत संशयित रुग्णांचा आकडा 271 वर जाऊन पोहोचला आहे
- नाशिकातही चार संशयित रुग्णांची भर पडली आहे
- मालेगावातही रुग्ण संख्या 44 वर पोहोचली आहे, त्यामुळे चिंतेत भर पडली आहे
गोवर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात लसीकरण हा एकच उपाय आहे. मात्र 0-9 महिने मुलांमध्ये गोवरची लागण होण्याचं प्रमाण 8-9 टक्के आहे. त्यामुळे या मुलांना देखील लस देत सुरक्षित करावं असं मत अनेक डॉक्टर तसंच तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यासंबंधी मुंबई पालिकेकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे.
गोवरचा उद्रेक थांबवायचा असेल तर यासाठी एकच मोठे हत्यार आहे ते म्हणजे लसीकरण आणि त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व्हेक्षण करत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात लसीकरणाचे अतिरिक्त सत्र घेत गोवरचा उद्रेक कमी करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. मात्र, त्याला गरज आहे ती लसीकरणाला साथ देत त्याचा वेग कायम ठेवण्याची.
Tanaji Sawant on Measles : गोवरच्या साथीसाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )