एक्स्प्लोर
मावळच्या जाधववाडी धरणात बुडून एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू
एसटी महामंडळात बॉडी फिटरचे काम करणारे दादासाहेब गायकवाड यांच्याकडे त्यांची बहीण, मुलगी आणि भाची सुट्टीसाठी आले होते. जाधववाडी धरणावर सहकुटुंब फिरायला गेले होते.
मावळ : मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतात 8 वर्षीय मुलासह तिघांचा समावेश आहे. प्रशिल अढाव, अनिल कोळसे आणि प्रीतेश आगळे अशी मृतकांची नावं आहेत. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. आज दुपारी ही घटना घडली.
खेड तालुक्याच्या येलवाडी येथून हे सर्व फिरायला आले होते. एसटी महामंडळात बॉडी फिटरचे काम करणारे दादासाहेब गायकवाड यांच्याकडे त्यांची बहीण, मुलगी आणि भाची सुट्टीसाठी आले होते. जाधववाडी धरणावर सहकुटुंब फिरायला गेले होते.
एनडीआरएफ कॅम्प शेजारीच असणाऱ्या या धरणात दादासाहेब यांच्या बहिणीचे 58 वर्षीय पती अनिल कोळसे यांचा पाय घसरला. यावेळी त्यांनी दादासाहेब यांचा हात धरला. यावेळी ते आणि शेजारीच खेळत असलेला भाचीचा मुलगा प्रशिल ही पाण्यात बुडाला. हे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी दादासाहेब यांचे जावई प्रीतेश पाण्यात उतरले.
नंतर दादासाहेब यांची पत्नी आणि मुलगी वाचवण्यासाठी धावल्या. हे पाहून इतर नातेवाईकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. एनडीआरएफ जवानांच्या कानावर मदतीची हाक पडताच जवान बोटीसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी दादासाहेब, त्यांच्या पत्नी आणि मुलीला बाहेर काढले. पण दादासाहेब यांच्या बहिणीचे पती अनिल कोळसे, जावई प्रीतेश आगळे आणि भाचीचा मुलगा प्रशिल अढाव यांना मात्र वाचवू शकले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement