Marathwada Weather: मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.

Agriculture Weather Advisory: राज्यात मुंबई, काेकणपट्ट्यासह विदर्भात अकोला, चंद्रपुरात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आलीय. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 36-37 अंश सेल्सियस पर्यंत पारा जात आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडयात दिनांक 14 ते 20 मार्च 2025 दरम्यान पाऊस सरासीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. (Weather)
पीक व्यवस्थापन कसे कराल?
- काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उनहात वाळवून साठवणूक करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
- मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.
मका, भुईमुग सांभाळा
- कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
- उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
- फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.
- कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
- उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 18.8% 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
- कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
- नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
- नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 00:52:34 एक किलो व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

