Marathwada Flood : मराठवाड्यातील 1023 गावांना बसू शकतो पुराचा फटका; सर्वाधिक पूरप्रवण गावे नांदेड जिल्ह्यात
Marathwada Flood Possibility Village : सर्वाधिक सर्वाधिक 337 गावांची नांदेड जिल्ह्यात पूरप्रवण गावे म्हणून नोंद करण्यात आली आहेत.
Marathwada Flood Possibility Village : जून महिना कोरडा गेल्यावर आता दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात (Marathwada) पाऊस (Rain) सक्रिय झाला आहे. त्यामुळे अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. काही भागात पावसाची रिपरिप सुरु असून, काही ठिकाणी पाऊस वाढला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. अशात मराठवाड्यात 23 गावे 1 हजार पूरप्रवण (Flood) म्हणून नोंद करण्यात आली असून, या गावांच्या स्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात 'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून आहेत.
मराठवाड्यात पावसाळ्यात अनेक भागांत पुराची स्थिती निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते. गावांना पुराचा वेढा पडल्याने त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत होते. अनेकदा याच पुराच्या पाण्यात बुडून अनेकांना जीवही गमवावा लागतो. प्रत्येक पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. तर वारंवार पूर येणाऱ्या गावांची यादी प्रशासनाने तयार करुन ठेवली असून, पाऊस सक्रिय झाल्यानंतर या गावावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तर मराठवाड्यात 1 हजार 23 गावे पूरप्रवण म्हणून नोंद करण्यात आली आहे. ज्यात सर्वाधिक सर्वाधिक 337 गावांची नांदेड जिल्ह्यात पूरप्रवण गावे म्हणून नोंद करण्यात आली आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात 165 गावे पूरप्रवण आहेत.
कशी असते मराठवाड्यातील परिस्थिती?
- गोदावरी, पूर्णा, दुधना, पैनगंगा, मांजरा, तेरणा या मराठवाड्यातील प्रमुख नद्या आहेत.
- पावसाळ्यात या नद्यांना पूर येतो आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरते.
- पूरस्थितीमुळे संकट निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या आपत्ती निवारण विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जातात.
- औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 165 पूरप्रवण गावांची नोंद करण्यात आली आहे.
- जालना जिल्ह्यातील देखील 47 गावांची पूरप्रवण म्हणून नोंद करण्यात आली आहे.
- विभागातील परभणी जिल्ह्यात 118 गावांची पूरप्रवण म्हणून नोंद करण्यात आली आहे.
- हिंगोली जिल्ह्यात देखील 70 गावांची पूरप्रवण म्हणून नोंद करण्यात आली आहे.
- नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 337 गावांची पूरप्रवण म्हणून नोंद करण्यात आली आहे.
- बीड जिल्ह्यात देखील 63 गावांना पुराचा धोका असल्याची नोंद करण्यात आली आहे.
- लातूर जिल्ह्याच्या 73 गावात सुद्धा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 140 गावांची नोंद पूरप्रवण म्हणून नोंद केली गेली आहे.
'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून
पावसाळ्यातील पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी असलेली ही तुकडी दीड महिना नांदेड येथे वास्तव्याला राहणार आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून, पावसाळ्यामध्ये नद्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. जिल्ह्यात 337 पूर प्रवण गावे आहेत. त्यामुळे आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडी जिल्ह्यात मुक्कामी आहे. ज्यात 33 जवानांचा समावेश आहे. दीड महिना थांबणार आगामी पुराचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेडमध्ये तैनात केली आहे. 15 जुलै ते 31 ऑगस्ट या काळात 33 जवानांची तुकडी वास्तव्यास राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्यातील 21 मंडळात अतिवृष्टी; सरासरी 56.60 मिमी पावसाची नोंद