एक्स्प्लोर

Sharad Pawar : देशात विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावतोय; शरद पवारांचे साहित्यिकांना आवाहन, म्हणाले...

Sharad Pawar Speech in Sahitya Sammelan : ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. उदगीर येथील 95 व्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी उद्घाटन भाषणात त्यांनी वक्तव्य केले.

Sharad Pawar Speech in Sahitya Sammelan : आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकानी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केले आहे. लातूर येथील उदगीर येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. 

शरद पवार यांनी आपल्या भाषणातून देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी पवार यांनी म्हटले की, समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारची प्रोपागंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने 'माईन काम्फ' पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपागंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण असल्याकडे ही शरद पवार यांनी लक्ष वेधले. 

साहित्य मुक्त असावे

आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले. साहित्य हे मुक्त असावे याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते असे पवार यांनी म्हटले. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे असे आवाहन त्यांनी केले.  राज्यकर्ते थेटपणे प्रोपागंडा करत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसत असल्याचे पवार यांनी म्हटले.

कॉर्पोरेट हस्तक्षेपाने चौथा स्तंभ कोसळण्याची भीती
 
शरद पवार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कॉर्पोरेट क्षेत्राच्या हस्तक्षेपावर भाष्य केले आहे. कॉर्पोरेटचे छत्र हे प्रोपागंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे. हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हा धोका लक्षात घेतला पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटले. 

महिला संमेलनाध्यक्षासाठी घटना दुरुस्त करा

महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी तर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिला अध्यक्ष निवड व्हावी अशी तरतूद व्हावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. पहिले साहित्य संमेलन 1878 मध्ये पार पडले. मात्र, महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळण्यासाठी 1961 साल उजाडावे लागले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget