Ramdas Athawale on Manoj Jarange: मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण..; रामदास आठवले मनोज जरांगेंच्या आंदोलनावर स्पष्टच बोलले
Marata Reservation News: मराठ्यांना कागदपत्र तपासून कुणबी आरक्षण मिळावं, असं आमचं मत आहे, पण ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय होऊ नये, असं रामदास आठवले म्हणाले.
Ramdas Athawale on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, सरकार मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर मार्ग काढत आहे. सोबतच मराठ्यांना (Maratha Samaj) कागदपत्र तपासून कुणबी (Kunbi) आरक्षण मिळावं, असं आमचं मत आहे. परंतु, ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय होऊ नये, या दृष्टीकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी दिली आहे. मुलुंडमध्ये रामदास आठवले (Ramdas Athawale) हे खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्या प्रेरणा रास गरब्याच्या कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले की, "मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेच, परंतु सहसकट सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं नाही, ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशाच लोकांना आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे यातून मार्ग काढायला पाहिजे आणि हा मार्ग काढण्यात सरकार यशस्वी होईल, असं मला वाटतं. जरांगे पाटील यांना माझं निवेदन आहे की, त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, आरक्षण हवं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे, सरकार आपल्या बाजुनं आहे. सरकार नक्कीच यातून मार्ग काढेल."
ओबीसींवर अन्याय होऊ नये, या दृष्टिकोनातून काळजी घेणंही गरजेचं : रामदास आठवले
मराठा समाजानं अनेक वेळा अशी मागणी केली होती की, "आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको आहे, आम्हाला ओबीसींवर अन्याय करायचा नाही, परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ओबीसीला ट्रीट केल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही म्हणून जरांगे पाटलांनी तशी मागणी केलेली आहे. परंतु, विदर्भ कोकणमध्ये अनेकांना कुणबी दाखला मिळत आहे. मराठवाड्यामधील लोकांना ते मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, पुरावे तपासून याचा विचार करावा, असं आपलं मत आहे. ओबीसींवर अन्याय होऊ नये, या दृष्टिकोनातून काळजी घेणंही गरजेचं आहेच."