एक्स्प्लोर

औरंगाबाद, सिंधुदुर्गात चक्काजामला हिंसक वळण

मुंबई : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत. मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर चक्काजाम करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातही आंदोनाला हिंसक वळण सिंधुदुर्गात आयोजित चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही भागात रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून वाहतूक रोखण्यात आली. सिंधुदुर्गात आज एकूण25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा मराठा संघटनांच्या चक्काजाममुळे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या  सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. LIVE: दादर पूर्वमधील चित्रा टॉकिज परिसरात मराठा समाजाच्या चक्काजामला सुरुवात, लालबाग ते दादर वाहनांच्या मोठ्या रांगा LIVE: अहमदनगरमध्ये चैदाही तालुक्यात मराठा समाजाचं चक्काजाम, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त LIVE : मुंबईतील दादर फ्लायओव्हरवर गटारचे झाकन टाकून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सिमेंटचं झाकण टाकून कार्यकर्त्यांनी पळ काढला LIVE : पंढरपूर-सातारा रोड बंद, सकाळी 9 वाजल्यापासून चक्काजामला सुरुवात, रस्त्यावर वाहनेच नसून पोलिसांचा मोठा फौजफाटा LIVE : डोंबिवली, ठाणे, मुलुंड, मुंबई-पुणे महामार्गावर मराठा समाजाचा चक्काजाम, तर कामोठ्यातील कळंबोली इथे आंदोलन सुरु LIVE : मराठा समाजातर्फे चक्काजामला सुरुवात, डोंबिवलीत मराठा समाजाच्यावतीने चार रस्ते जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम -------------------- मुंबई : सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुंबईसह राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजामचं आयोजन करण्यात आलं आहे. 29 जानेवारी रोजी मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी बैठक मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात पाड पडली होती. चक्काजाम आंदोलन कसं यशस्वी करता येईल, याबाबतची रणनीती बैठकीत आखण्यात आली. मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर चक्काजाम करण्यात येणार आहे. तसंच दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला जाणार आहे. तसंच मुंबई-अहमदाबाद महामार्गांसह इतर महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. यासह जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करतील, असंही आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. या चक्काजाम आंदोलनात मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान 6 मार्चला मुंबईत मराठा समाजाचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget