एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
मराठा आरक्षण : औरंगाबाद - क्रांती चौकात ठिय्या आंदोलन
सोलापुरातील शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी सोलापुरात मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवाजी चौकात आंदोलकांनी गर्दी केली आहे. शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
आंदोलकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. वारी सुरळीत व्हायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात पाय ठेवू नये. पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेत पांडुरंगाची पूजा करण्याचा प्रयत्न करु नका. समाजाची फसवणूक करून पंढरपुरात याल तर उद्रेक होईल, असा इशारा सोलापूर सकल मराठा समाजाने दिला आहे.
लाईव्ह अपडेट
- औरंगाबाद - क्रांती चौकात ठिय्या आंदोलन, सत्ताधारी नेत्यांविरोधात घोषणाबाजी
- सोलापूर - चक्का जाम आंदोलनातील कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांची एका एसटी बसवर दगडफेक
- लातूर-सोलापूर रस्त्यावर औसा शहरातील चौकात चक्का जाम, वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























