Maratha Reservation Protest Manoj Jarange Live : कुठे डीजे, तर कुठे ढोल-ताशांचा गजर, मनोज जरांगे अन् मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी, गावागावांत जल्लोष
Maratha Reservation Protest Manoj Jarange Live : मनोज जरांगेंची नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.

Background
Manoj Jarange Mumbai March Live Update : राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार : मनोज जरांगे
"समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत.", असं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसेच, मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी जाहीर केलं.
रात्री उशीरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचं मराठा बांधवांना सांगितलं. तसेच, सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचं सांगितलं. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावं, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र द्यावं, ही मागणी मान्य झाली आहे. तसेच, सरकारनं सगे सोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढले आहेत. सुधारित अध्यादेश मला देण्यात आल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेसुद्धा मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
"वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे.", असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Manoj Jarange LIVE : बीड जिल्ह्यात मातोरीमध्ये डीजेच्या तालावर अख्ख्या गावानं धरला ठेका
Manoj Jarange LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती आणि आज अखेर ही घोषणा खरी ठरली आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरी डीजेच्या तालामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. गुलाल उधळला जातो पेढे वाटले जात आहेत आणि यामध्ये अख्खा गाव नाचताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गावातील महिलासुद्धा या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत.
Maratha Reservation LIVE UPDATES: येवला : मराठा समाजाचा येवल्यात भगवे झेंडे घेवून जल्लोष
Manoj Jarange, Maratha Reservation LIVE UPDATES: मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारपुढे ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य केल्यानं नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. हातात भगवे ध्वज घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक सरकार, मुख्यमंत्री झाले मात्र मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभारही यावेळी मानण्यात आले.
























