(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation Live Updates : मराठा आरक्षण वैध की अवैध? आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वाचा निकाल
Maratha Reservation News : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
LIVE
Background
Maratha Reservation Supreme Court Hearing Live Updates : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
Maratha Reservation Live Updates : मनोज जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी
Manoj Jarange on Maratha Reservation : आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल - मनोज जरांगे
Manoj Jarange on Maratha Reservation : आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
Manoj Jarange Patil News : आज यवतमाळमध्ये मनोज जरांगेंची सभा
Maratha Reservation Live Updates : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंची आज यवतमाळमध्ये सभा आहे. त्यानंतर जरांगेंची पुसदमध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
Maratha Reservation Live Updates : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचा उल्लेख करत सर्व खासदारांना संभाजीराजेंनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे
Maratha Reservation Live Updates : क्युरेटिव्ह याचिकेवर मराठा आरक्षणाचं भवितव्य, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Live Updates : Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पीटिशनवर (Curative Petition) आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.