एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत जाहीर सर्वपक्षीय चर्चा आयोजित करा, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण स्पष्टता निर्माण होण्यासाठी जाहीर सर्वपक्षीय चर्चा आयोजित करावी आणि त्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या बाबतीत ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन समाजामध्ये पूर्ण स्पष्टता निर्माण होण्यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत जाहीर सर्वपक्षीय चर्चा आयोजित करावी आणि त्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Letter to CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आरक्षणाचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत आरोप प्रत्यारोपांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण या विषयावर तज्ञांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय चर्चासत्र प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत जाहीरपणे करावे. खुल्या चर्चेच्या आधारे मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी नक्की काय करावे याचा आराखडा तयार करावा. 

Maratha Reservation : पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, अशोक चव्हाण म्हणाले, लढ्याला मोठा धक्का, भाजप म्हणतंय राज्य सरकारने स्वस्थ बसू नये!

चर्चेसाठी उपस्थित राहणाऱ्या तज्ज्ञांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, ज्येष्ठ वकील रफिक दादा, मा. डॉ. सर्जेराव निमसे आदी मान्यवरांचा समावेश असावा. चर्चेचे थेट प्रक्षेपण केले म्हणजे राज्यभरातील असंख्य सर्वसामान्य समाजबांधवांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल व त्यांच्या मनात स्पष्टता निर्माण होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात सुचविले आहे.

Maratha Reservation : मोठी बातमी... मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, घटनेच्या 102 व्या दुरुस्तीचा अन्वयार्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या राज्यातील एखादी जात मागास ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे म्हटले आहे. पण त्यासाठी राज्याकडून राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल केंद्राकडे पाठविला जाण्याची आवश्यकता आहे. नंतर संबंधित जातीचा समावेश मागासांच्या सूचीत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार आरक्षणाचा कायदा राज्यानेच करायचा आहे. मराठा समाज मागास आहे याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा प्राप्त होणे हा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा आवश्यक टप्पा आहे. त्यासाठीची प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Sambhajiraje Chhatrapati : एक महिना घ्या, पण मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा - संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणासाठी करण्यासारखे बहुतेक सर्व काही राज्य सरकारच्या अधिकारातच आहे, याची त्यांनी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली आहे. तसेच याबाबत केंद्र सरकारकडे आपल्याला काही पाठपुरावा करायचा असल्यास समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आपल्याला मदत करेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Inflation : महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget