एक्स्प्लोर
..तर बुलेटऐवजी बॅलेटमधून उत्तर मिळेल: मराठा शिष्टमंडळ
नागपूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूरच्या सकल मराठा-कुणबी मूक मोर्चाची सांगता झाली. मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साद घातली.
"आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका", असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिलं.
यावर "तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणार नाही", असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
याशिवाय मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्या, अन्यथा बुलेटऐवजी बॅलेटमधून सरकारला उत्तर मिळेल, असा इशारा आज मराठा तरुणींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिला.
नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मॉरिस टी पॉईंटवर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चामध्ये सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला. मराठा मोर्चातील मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.
सरकारकडून चंद्रकांतदाद पाटील, तावडें उपस्थित
दुपारी दोनच्या सुमारास मराठा मोर्चा समारोप ठिकाणी म्हणजेच मॉरिस टी पॉईंटवर पोहोचला. इथे सरकारच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी येऊन निवेदन देणाऱ्या युवतींची भेट घेतली. तसंच त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेले. तिथे युवतींनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.
शिष्टमंडळाला मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा समाजाने मूक मोर्चाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं. नागपुरात शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन, आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
"आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका", असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिलं.
यावर "तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणार नाही", असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
"तसंच कोपर्डी बलात्काराची घटना निंदनीय आहेच. 20 तारखेपासून कोपर्डी बलात्काराची दररोज सुनावणी सुरु होईल. तसंच अट्रॉसिटीचा दुरुपयोग टाळण्यासाठी अभ्यास सुरु आहे. मराठा आरक्षण ही संवैधानिक प्रक्रिया आहे. कोर्टात आम्ही भक्कम बाजू मांडू" असं मुख्यमंत्री म्हणाले.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या
नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या मोर्चाद्वारे कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.
सर्वपक्षीय आमदार मराठा मोर्चात
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज मराठा मूक मोर्चा विधानभवनावर धडकणार होता. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली होती.
या मोर्चात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनीही सहभाग नोंदवला. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोर्चात सहभागी झाले .
शिवसेनेच्या आमदारांनी भगवे फेटे बांधून मोर्चात सहभाग घेतला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस आमदार मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी विधानभवनातून पायी रवाना झाले.
मोर्चाचा क्रम
या मोर्चात अन्य मोर्चाप्रमाणेच तरुणी, महिला, वकील, डॉक्टर, मेडिकलचे विद्यार्थी, पुरुष आणि त्यानंतर राजकीय नेते या क्रमानेच होते. या क्रमाने मोर्चा यशवंत स्टेडिअमवरुन मोर्चा मॉरिस टी पाईंटच्या दिशेने रवाना झाला.
मोर्चेकऱ्यांच्या पायपीट
या मोर्चासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. अन्य जिल्ह्यातील मोर्चाची गर्दी लक्षात घेता, मोर्चेकऱ्यांच्या वाहनांचं पार्किंग चार किमी लांब ठेवलं होतं. त्यामुळे मोर्चेकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागली. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला. या नादात सकाळी अकरा वाजता सुरु होणारा मोर्चा दुपारी 12.15 च्या सुमारास सुरु झाला.
पोलिसांचा फौजफाटा
दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्ताशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती. याशिवाय मोर्चातील हालचालींवर विशेष कॅमेऱ्यांची नजर होती.
- 1 अतिरिक्त आयुक्त, 6 अतिरिक्त उपायुक्त, 8 एसीपी, 180 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक
- 8 एसआरपी तुकड्या
- सुमारे 1000 पोलीस,
- एकूण 250 अधिकारी, 250 ट्रॅफिक पोलिस
- यशवंत स्टेडियम परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांवर चेकिंग.
- जड वाहतूक सकाळपासून बंद
- 1 अतिरिक्त आयुक्त, 6 अतिरिक्त उपायुक्त, 8 एसीपी, 180 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक
- 8 एसआरपी तुकड्या
- सुमारे 1000 पोलीस,
- एकूण 250 अधिकारी, 250 ट्रॅफिक पोलिस
- यशवंत स्टेडियम परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांवर चेकिंग.
- जड वाहतूक सकाळपासून बंद
शिष्टाचार डावलणार, 169 मराठा-कुणबी आमदार मोर्चात दिसणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement