एक्स्प्लोर

शाहूंच्या नगरीत मराठ्यांसाठी सर्व जातीचे रस्त्यावर!

कोल्हापूर:  विराट संख्येने निघालेल्या मराठा मूकमोर्चाचा समारोप ऐतिहासिक दसरा चौकात झाला. राजर्षी छत्रपती शाहू महारांज्या करवीर नगरीत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्वच जातीचे लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुस्लिम बांधवांनीही मराठा समाजाच्या मोर्चात हिरीरीने सहभाग घेतला. राज्यातील अन्य मराठा मोर्चांप्रमाणेच या मोर्चातही लाखोंची गर्दी जमल्याचा दावा केला जात आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी या मोर्चांची सुरुवात झाली. त्यानंतर शेवटी दसरा चौकात सर्वजण एकत्र आले. मग मुलींनी आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. Kolhapur Morcha 6-compressed राजे रस्त्यावर या मोर्चात खासदार छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे भोसले, यांच्यासह माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ सहभागी झाले होते. मोर्चासाठी सकाळपासून शहरात येणारे ९ मार्ग आणि अंतर्गत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासह सीमावासियही या मोर्चात सहभागी झाल्यानं राष्ट्रीय महामार्ग कोगनोळी इथं मंदावला होता. विशेष म्हणजे मराठा मोर्चांना पाठिंबा देण्यासाठी इतर समाजांच्या समर्थनाचे बॅनरही कोल्हापुरात लागल्याचं दिसून आलं. शाहूंच्या नगरीत मराठ्यांसाठी सर्व जातीचे रस्त्यावर! जथ्थेच्या जथ्थे दसरा चौकाकडे कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाला सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली. लाखो मराठा बांधवांच्या उपस्थित मूक मोर्चाला सुरुवात झाली.  गांधी मैदान, सायबर चौक, कसबा बावडा, ताराराणी चौकातून लाखोंचे जथ्थे दसरा चौकाकडं रवाना झाले. एक मराठा लाख मराठा घातलेल्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन मोर्चेकरी सामील झाले आहेत. दहा-दहा किमीची पायपीट या मोर्चासाठी पार्किंगची व्यवस्था शहराबाहेरच केल्याने, मोर्चेकऱ्यांनी तब्बल 10-10 किमीची पायपीट करुन, दसरा चौकात हजेरी लावली. शाहूंच्या नगरीत मराठ्यांसाठी सर्व जातीचे रस्त्यावर! सर्व जातीचे लोक रस्त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महारांज्या करवीर नगरीत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्वच जातीचे लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुस्लिम बांधवांनीही मराठा समाजाच्या मोर्चात हिरीरीने सहभाग घेतला. मोर्चेकऱ्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून पाणी, नाश्ता वाटपाचे स्टॉल ठिकठिकाणी उभे केले होते. हजारो सीमावासिय कोल्हापुरात एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत, हजारो सीमावासीय कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळीच रवाना झाले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळल्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत सीमावासीयांनी कोल्हापूरकडे कूच केली. दुचाकी ,कार ,टेम्पो ,ट्रक आदी विविध वाहनातून हजारो सीमावासीय कोल्हापूरला रवाना झाले . बेळगाव शहरासह आजूबाजूच्या गावातील कार्यकर्ते क्रांती मेळाव्यात सहभागी झाले . महापौर सरिता पाटील देखील पूर्वतयारीसाठी कालच कोल्हापूरला रवाना झाल्या होत्या. पाय ठेवायलाही जागा नाही कोल्हापूरच्या मोर्चासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव, सिंधुदुर्ग,रत्नागिरी आदी जिल्ह्यातूनही नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती,अशी परिस्थिती कोल्हापुरात पाहायला मिळाली. ************************************************************************************** लाईव्ह अपडेट कोल्हापूर: मराठा मूकमोर्चाचा हुंकार आज कोल्हापुरात निघाला आहे. कोल्हापुरातला हा मोर्चा याआधीच्या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड तोडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे सुरु झाले असून शेवटी सर्व आंदोलक दसरा चौकात जमणार आहेत. त्यामुळे सकाळपासून शहरात येणाऱे ९ मार्ग आणि अंतर्गत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासह सीमावासियही या मोर्चात सहभागी झाल्यानं  राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी इथं वाहनांची गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्यासह माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ हे देखील मोर्चात सहभागी झाले आहेत. LIVE UPDATE कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. लाखो मराठा बांधवांच्या उपस्थित मूक मोर्चाला सुरुवात झाली.  गांधी मैदान, सायबर चौक, कसबा बावडा, ताराराणी चौकातून लाखोंचे जथ्थे दसरा चौकाकडं रवाना झाले. एक मराठा लाख मराठा घातलेल्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन मोर्चेकरी सामील झाले आहेत. - सीमावासियांची कोल्हापूरकडे कूच, कोगनोळीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा - हजारो सीमावासिय कोल्हापुरात एक मराठा लाख मराठा ,जय भवानी जय शिवाजी ,शिवाजी महाराज की जय घोषणा देत हजारो सीमावासीय कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळीच रवाना झाले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळल्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत सीमावासीयांनी कोल्हापूरकडे कूच केली. वाहनांवर मोर्चाची स्टिकर ,बॅनर ,भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. महिलाही भगवे फेटे परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभागी. दुचाकी ,कार ,टेम्पो ,ट्रक आदी विविध वाहनातून हजारो सीमावासीय कोल्हापूरला रवाना झाले . बेळगाव शहरासह आजूबाजूच्या गावातील कार्यकर्ते क्रांती मेळाव्यात सहभागी होणार आहेत . महापौर सरिता पाटील देखील पूर्वतयारीसाठी कालच कोल्हापूरला रवाना झाल्या असून तेथील व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली . खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणार kolhapur - दीड हजार पोलिसांच्यासोबत 10 हजार स्वयंसेवक तैनात - महसूल मंत्री चंद्रकात पाटील देखील मोर्चात सहभागी होणार - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापूमध्ये मोर्चा कोल्हापुरातील फ्लेक्ची सध्या महाराष्ट्रावर चांगलीच चर्चा सुरु आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत. दरम्यान, मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंगची ठिकाणं सोशल मीडियावरुन नागरिकांना कळवण्यात आली आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमधल्या मराठा मोर्चाची तयारी आसपासच्या शहरातही सुरु आहे. कराडमधल्या एका सलूनमध्ये तर या मोर्चात सहभागी होण्यासाठी खास हेअरस्टाईल करण्यासाठी रांग लागली आहे. एक मराठा लाख मराठा... हे घोषवाक्य असो... किंवा मराठा समाजाचं प्रतीक असलेला भगवा झेंडा... किंवा चक्क शिवरायही या कलाकुसरीत उमटतात. कराडच्या दिलबहार सलूनमध्ये मराठा मोर्चांची डिझाईन्स कोरण्याचं काम अगदी लीलया सुरु आहे. विशेष म्हणजे ही सारी कलाकुसर कृष्णा काशिद फ्रीमध्ये करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget