एसटी महामंडळाच्या बसमधून बोगस खत जप्त
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात एसटी बसेसची वाहतूक कमी आहे त्याच संधीचा फायदा घेण्याचा या टोळीचा प्रयत्न होता. परंतु तो कृषी विभागाने हाणून पाडला आहे.
यवतमाळ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची लगबग सुरू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांची शेती पिकासाठी गरज असते नेमक्या त्याचवेळी बोगस खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याच प्रयत्न बोगस खत तयार करणाऱ्या टोळीचा होता. त्याचा हा मनसुभा कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाही करत उधळून लावला आहे .
विशेष म्हणजे हर्ष नामक हे बोगस खत वाहतूकसाठी खत पाठविणाऱ्या टोळक्याने एसटी महामंडळाच्या एसटीच्या ट्रान्सपोर्ट बस मधून हे 10 टन बोगस खत पाठविले होते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात एसटी बसेसची वाहतूक कमी आहे त्याच संधीचा फायदा घेण्याचा या टोळीचा प्रयत्न होता. परंतु तो कृषी विभागाने हाणून पाडला आहे.
जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बोगस खत करण्यात आले आहे. यामध्ये 10 टन रासायनिक बोगस खत जप्त करण्यात आले आहे. साधारण 2 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक खताची बॅगची किंमत 1250 रुपये एवढी आहे. दिग्रसच्या तिवरी येथील एका कृषी केंद्रात हे खत आले होते कृषी विभागाने छापा टाकून याचा भांडाफोड केला आहे. बोगस खताचा साठा खत पाठविणाऱ्यांच्या शोधात कृषी विभागाचे पथक चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पोहोचले असून त्यांची लिंक (साखळी) कृषी विभाग शोधत आहे.
ही बस ब्रम्हपुरी डेपोची असून बोगस खत कारखाना गडचिरोलीच्या वडसा आढळला असल्याचे कृषी अधिकारी यांनी बरडे यांनी सांगितले आहे. वडसा येथे मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्याची कारवाही सुरू असून या प्रकरणी कृषि केंद्र चालक आणि बस वाहतूक करणारे इतर दोन असे एकूण तीन जण दिग्रस पोलिसांच्या अटकेत आहे .याचे या बोगस तयार करणाऱ्यांचे धागेदोरे पोलीस शोधत आहेत.
Corona Mega Plan | कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना, एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करण्याचं आव्हान