एक्स्प्लोर

तुम्ही फडणवीसांची सुपारी घेतली, मला धमकी देऊ नका नाहीतर...जरांगेंचा नारायण राणेंना निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange : राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस याच ऐकून ते मला बोलत आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

अमरावती:   राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कायम राहिलेत. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते पुढे सरसावतात. यावेळी आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते थेट जरांगेंच्या निशाण्यावर आहे. फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं  वाटोळं करू नका, असे म्हणत मनोज जरांगेंनी भाजप खासदार  नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.  मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो, असेही जरांगे यावेळी म्हणाले. 

मनोज जरांगे म्हणाले, फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका.   नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं.   मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो.  राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांच ऐकून ते मला बोलत आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली.  मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही. मराठा समाजाने चांगले चांगले पाया खाली चिरडले आहेत, तुम्ही कोण आहात?

नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं: मनोज जरांगे

नारायण राणेंवर मनोज जरांगे म्हणाले,  तो काहीही बरळत आहे. आम्ही कोणाचे उपकार विसरत नाही.  त्यांना मला धमकी देण्याची काही गरज नाही. मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठ करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका.. मी नारायण राणे यांचा सन्मान करतो...मी मराठा समाजाचे काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देत आहेत. 

काय आहे प्रकरण?

मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीका करायची आणि त्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायचं. आरक्षणाच्या मुद्द्यावरचा हा राजकीय सवाल-जवाब महाराष्ट्राला आता नवीन नाही.  मात्र जरांगेंना जवाब देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपचा नारायण राणेंच्या रुपाने एक चेहरा पुढे  सरसावलाय. गणपतीनंतर जरांगेंना जाब विचारण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.  जरांगेंनी देखील राणेंचं आव्हान स्वीकारत त्यांना इशारा दिला आहे.  मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर बोलू नये असं नारायण राणेंनी म्हटलंय. भाजप नेत्यांची बाजू घेत राणेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय.. याला जरांगेंनीही प्रत्युत्तर दिलंय.. धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितलं का? असा सवाल जरांगेंनी विचारलाय. निलेश राणेंनी नारायण राणेंना समजावून सांगावं असंही जरांगे म्हणाले.

Video : अनिल बोंडे... माझ्या नादी लागू नको,फडणवीसांचं राजकीय करिअर संपेल

हे ही वाचा :

फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको; मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्याला झोडपलं

 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget