फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको; मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्याला झोडपलं
Manoj Jarange: मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठं करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका, असे मनोज जरांगे नारायण राणेंना म्हणाले.
अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलं काम करत नाहीये, त्यांचं राजकीय करियर संपवून जाईल. तू माझ्या नादी लागू नको, हे सगळं देवेंद्र फडणवीस करत आहे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच 29 ऑगस्टला लढायचे की पाडायचं याची घोषणा होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, तू माझ्या नादी लागू नको. हे सगळं देवेंद्र फडणीस करत आहे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत नाहीये, त्यांचं राजकीय करियर संपवून जाईल. शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, फक्त त्यांना आरक्षण देण्यासाठी कोणी अडवू नये. देवेंद्र फडणवीसला भांडण घडवून आणायचे आहेत. आमच्या जवळचे लोक फोडतो आणि त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावतो. जर राणे साहेब जाहीर धमकी देणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसले तर आम्ही त्यांना रोज बोलणार आहे. ज्यांनी मराठ्यांच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या, त्यांचं रक्त सांडलं त्यांच्या बाजूने बोलत आहे.
नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं : मनोज जरांगे
राणे साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत, तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. राणे दादा तुम्हाला मी आव्हान दिलेलं नाही, मला तुम्ही धमकी देऊ नका, तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांचे ऐकूण ते मला बोलत आहेत. तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली. मी देवेंद्र फडणवीस ला मोजत नाही. मराठा समाजाने चांगले पायाखाली चिरडले आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठ्यांच्या विरोधात मोठ्या शक्त्या एकवटल्या : मनोज जरांगे
राज ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्यावर मनोज जरांगे म्हणाले, डोके त्यांचा मित्र फोडतो, मराठे फक्त हक्क मागत आहे. कुणबी आणि मराठा रक्ताने एकत्र आहे, आमचं दुखणे सारखेच आहे. आपल्या पोरांच्या भल्यासाठी आपण एकत्र या, सगळ्यांनी जात मोठी करण्यासाठी एकत्र या... मराठ्यांच्या विरोधात मोठ्या शक्त्या एकवटल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसला मोठं करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका : मनोज जरांगे
नारायण राणेंवर मनोज जरांगे म्हणाले, तो काही ही बरळत आहे . आम्ही कोणाचा उपकार विसरत नाही. त्यांना मला धमकी देण्याची काही गरज नाही. मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठं करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका. मी नारायण राणे यांचा सन्मान करतो. मी मराठा समाजाचे काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देताय.
29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं ठरणार : मनोज जरांगे
तिसऱ्या आघाडीवर मनोज जरांगे म्हणाले, आघाडी फिघाडी नाही. कसे समीकरणे जुळतात कोण कोण एकत्र येत आहेत यासाठी एक बैठक होईल. 29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं याची घोषणा होणार आहे. सर्व गोरगरीब अपक्ष सर्व जाती धर्माचे लोक उभे राहणार आणि कचाकच पाडणार आहे.
Manoj Jarange Jalna Pc : अनिल बोंडे... माझ्या नादी लागू नको,फडणवीसांचं राजकीय करिअर संपेल
हे ही वाचा :
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेवर कोर्टाचा मोठा निर्णय, पहिल्या हप्त्याचं काय होणार?