अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष वाढतोय, कारण....नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील
छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वापर करायचा आहे तर अजित पवार (Ajit Pawar) यांना बाजूला सारायचे असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
Manoj Jarange patil : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वापर करायचा आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बाजूला सारायचे असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. छगन भुजबळ हे त्यांचा वापर करुन घेत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत. त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होत आहे. या कारणामुळं फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील रोष वाढत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.भुजबळांनी जरुर संरक्षण घ्यावं पण त्यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकार आम्ही जे करुन नका म्हणत आहोत तेच करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमचं सरकारनं एकही काम केलं नाही. मागच्या आंदोलनत म्हणले ओबीसींच्या सगळ्या सवलती तुम्हाला देऊ मात्र, अद्याप काहीही दिलं नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. नितेश राणे यांची मजबुरी आहे. फडणवीस त्यांना बोलायला वालत आहे. त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. जातीपेक्षा पक्षच मोठा आहे असं ते म्हणायला लागले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय?
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काय निर्णय घेतला ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे. येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यानी दिली. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यवर देखील टीका केली.
आतापर्यंत एकाही मंत्र्यांने विचारणा झालेली नाही. 17 डिसेंबरच्या आगोदर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनादरम्यान तुम्ही मंत्री पाठवले होते. 17 डिसेंबरच्या आत आरक्षणासंदर्भात काय झालं ते सांगा? अन्यथा ते व्हिडिओ फोटो माध्यमात जाहीर करु असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढं काय? अंतरवाली सराटीत ठरणार रनणिती, जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम