एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manoj Jarange Patil In Mumbai : मराठ्यांनी 20 जानेवारीला मुंबईत कसं पोहोचायचं? मनोज जरांगे पाटलांनी अॅक्शन प्लॅन सांगितला!

Manoj Jarange Patil In Mumbai : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा करतानाच स्वत: त्यांच्या आंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. 

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. बीडमध्ये आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सामाजिक राजकीय घटनांचा अभेद्य साक्षीदार असलेल्या मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा करतानाच स्वत: त्यांच्या आंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. 

तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही

बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं. सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

मनोज जरांगेंनी अॅक्शन प्लॅन सांगितला!

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कूच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही, मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेत जायचं, शांततेत यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. 

मुंगी शिरायला जागा नाही, या गर्दीला नतमस्तक

तत्पूर्वी, विराट सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, बीडमध्ये मराठ्यांचं वादळ आलं आहे. हा मराठ्यांचा महाप्रलय आहे. मुंगी शिरायला जागा नाही, या गर्दीला नतमस्तक होत आहे. बीडमध्ये घरं, हॉटेल जाळले, पण आपल्यावर डाग लावला, यांनीच स्वत:च्या घराला आग लावली, आमची पोरं गुतवली. निष्पाप मुलांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं काम सरकारने केलं आहे. मराठ्ंयानी शंताता रॅली काढली होती. 

ते म्हणाले की, येवल्याचं येडपट (छगन भुजबळ) त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचे हॉटेल जाळले, आता बारीक आवाजात बोलतोय. आधी कळत नव्हतं का? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी.  देशातील सगळ्या मोठ्या जातीचे घात करण्याचा तुम्ही घाट घातला आहे असे वाटायला लागलं, अशी टीकाही त्यांनी केली. 

तर राजकीय अस्तित्व संपवू 

सरकारकडून तारीख पे तारीख होत असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गर्भित इशारा सरकारला दिला. ते म्हणाले की, आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार आहे. यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी यांना मॅनेजच होत नाही. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठ्यांची एकजूट तुटू देणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP MajhaMahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Embed widget