राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यात कुठेही मराठा आंदोलन सुरू नाही, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन
राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणीही आडवू नका. कारण, सध्या राज्यात आपलं आंदोलन सुरु नाही हे मी सगळ्यांना सांगितल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणीही आडवू नका. कारण, सध्या राज्यात आपलं आंदोलन सुरु नाही हे मी सगळ्यांना सांगितल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जाब विचारायचा असेल तर आपण मुंबईला जाऊन जाब विचारु असेही जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील लोक माझ्या विरोधात टोळ्या उभा करत आहेत. आमच्या लोकांना फोडून माझ्याविरोधात पत्रकार परिषदा घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे डोक्यावर महापाप घेत आहेत. जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्यांना मी सोडत नाही असंही जरांगे म्हणाले. कोणत्याच राजकीय पक्षाला मराठ्यांना आरक्षण मिळावं असं वाटत नाही. माझ्यासोबत सामान्य मराठा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा
पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा. आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही असे जरांगे पाटील म्हणाले. मी कोणालाच सापडत नाही. माझं नाव सगळ्या नेत्यांसोबत लावली आहेत. देशातलं पहिलं आंदोलन असं आहे की, सातत्यानं एक वर्षापासून सुरु आहे. या आंदोलनात लोकांची संख्या ही लाखात आहे असं जरांगे पाटील म्हणाले. माझ्यावरील लोकांचं प्रेम कमी होऊ शकत नाही. हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. 10 लोक असले तरी मी मागे हटणार नाही. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत ते आम्ही पाडू असेही जरांगे पाटील म्हणाले. प्रविण दरेकर डोक्यावर महापाप घेत आहेत. दरेकर यांनी मराठ्यांचे समन्वयक फोडले आहेत. काही संघटना जमा केल्या आहेत. मला उघडं पाडण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांना हिणवलेलं मला सहन होत नाही
माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. मराठ्यांना हिणवतात ते मला सहन होत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळेच मी माझ्या शरीराचा कधीच विचार करत नाही. मागे हटायचं नाही, लढत राहायचं हे मी ठरवल्याचे जरांगे म्हणाले.
सध्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. सोलापूर, सांगली यानंतर काल कोल्हापूरमध्ये त्यांच्या शांतता रॅली संपन्न झाल्या आहेत. आज सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange Patil : राजकारण्यांनी मराठा समाजाची विभागणी केली, आधी नेत्यांची लाट, आता मराठा समाजाची लाट : मनोज जरांगे पाटील