Manoj Jarange Live : सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, सुनावणी सुरू
Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : आजचे दुपारचे जेवण पिंपरी-चिंचवडच्या तळेगावात केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम लोणावळा येथे केला जाणार आहे.
LIVE
Background
Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी मनोज जरांगे 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. त्यांच्या याच मुंबई आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी काल रात्री पुण्याच्या चंदननगर येथे मुक्काम केला आहे. तर, आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहे. तर आजचे दुपारचे जेवण पिंपरी-चिंचवडच्या तळेगावात केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम लोणावळा येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे जरांगे हे आपल्या मुंबई आंदोलनावर ठाम असून, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नसल्याचे त्यांनी म्हटले आहेत.
Mumbai News: सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, सुनावणी सुरू
Mumbai News: सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी सुरू
Gunratna Sadavarte vs Manoj Jarange :आंदोलनाविरोधात आवाज उठवणा-यांना धमकावलं जातंय, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद
या आंदोलनाविरोधात आवाज उठवणा-यांना धमकावलं जातंय. हिंसक विरोध केला जातोय. पण प्रशासन हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहतंय. कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.सदावर्तेंचा हायकोर्टात दावा
Gunratna Sadavarte vs Manoj Jarange : गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद, जरांगेंना मुंबईत परवानगी देऊ नका
मनोज जरांगे आणि त्यांचा समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी. जरांगे ज्या मार्गानं मुंबईकडे निघालेत ती ती शहरं त्यावेळी बंद करावा लागली. आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्राल झालाय. शाळा, कॉलेजं, दुकानं बंद करावी लागली. काही तासांत जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहचतील. हजारो बैलगाड्या, ट्रैक्टर शहरात आली तर ट्राफिकची काय अवस्था होईल, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात युक्तिवाद सुरू
Gunratna Sadavarte vs Manoj Jarange : गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेविरोधात याचिका, हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरु
गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी सुरू
Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न; सदवार्तेंचा आरोप
Manoj Jarange Live : मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी हायकोर्टात आम्ही गेलेलो आहोत. पुण्यामध्येही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता काही वेळात यावरती हायकोर्टात सुनावणी होईल. मुंबईत येण्यापासून रोखला जावा यासाठी आम्ही हायकोर्टात मागणी करत असल्याचे सदावर्ते म्हणाले.