मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या 600 शाळा, 50 महाविद्यालयांना सुट्टी
Manoj Jarange Chhatrapati Sambhajinagr: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये शांतता रॅली काढणार आहेत. दरम्यान, शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेत.
Chhatrapati Sambhajinagar: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅली होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील 600 शाळा व 50 महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात यार आली साठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी
छत्रपती संभाजीनगरातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी शहरातील सुमारे 600 शाळा आज बंद राहणार आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी हे आदेश काढले आहेत.
सिडको चौक ते क्रांती चौकापर्यंत राहणार रॅली
छत्रपती संभाजीनगर शहरात आज मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे शांतता रॅली काढणार आहेत. हिराली सिडको चौक ते क्रांती चौकापर्यंत राहणार असून मराठवाड्यातील शांतता रॅलीचा आज समारोप होणार आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरणार असून वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील रॅलीचा समारोप
मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करणार आहेत. सगेसोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे.
कसा असणार मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग?
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली काढतील. शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन नंतर क्रांती चौकात समारोप होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाहतुकीत मोठा बदल
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. हिराली सिडको चौक ते क्रांतीचौकापर्यंत असल्याने केंब्रिज चौक ते नगर नाका चौक तसेच कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक हे रस्ते बंद राहणार आहेत. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आल्या असून जालना रोड ऐवजी शहरातील इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: