अंतरवली सराटीत उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत प्रचंड खालावली, उठून बसणंही मुश्कील, संभाजीराजे छत्रपती अंतरवाली सराटीत दाखल
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांच्या तब्येत खालावली असून कोणत्याही आधाराशिवाय उठणे, बसणे त्यांना शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.
Jalna: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून जरांगेंची तब्येत खाल्यावली असून आधाराशिवाय उठणं शक्य नसल्याचं दिसत असताना संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवली सराटीत आले आहेत. डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस कैल्याचं सांगण्यात आलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून सहकाऱ्यांचा आधार घेत असून उपोषणाच्या सातव्या दिवशीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार असून निवडणूकांच्या तोंडावर मराठा आरक्षणप्रकरणी सरकार काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी केली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस
राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगेंवर ओबीसी नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना संभाजीराजे छत्रपती जालन्यात अंतरवली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी डॉक्टरांकडे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे समजते.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
अंतरवली सराटीत दाखल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकार कसं आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवं. हे आरक्षण कसं टिकणार आहे यावर बोला असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला,अठरापगड जातींसह बारा बलूतेदारांना न्याय दिला. त्यामुळं जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सरकारनं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी.
इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार असणार
मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. मी त्यांच्याशी व्यक्तीगत बोललोय. मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मी आधीसुद्धा होतो. आताही आहे. आणि पुढेसुद्ध असणार. असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. माझी सरकारला विनंती आहे. इकडे या. काय परिस्थीती आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. या इकडे बघा काय परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा आहेत तुमच्याकडे. इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार असणार. विरोधकही तेवढेच जबाबदार असतील. मनोज जरांगे पाटील या समाजासाठी योद्धा म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजीराजे छत्रपतींची आहे.
मनोज जरांगेंनी सातव्या दिवशीही उपचारास दिला नकार
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांच्या तब्येत खालावली असून कोणत्याही आधाराशिवाय उठणे, बसणे त्यांना शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान डॉक्टर आंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी उपस्थीत असले तरी जरांगे यांनी कोणताही उपचार घेण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.
आज मंत्रीमंडळाची मराठा आरक्षणावर महत्वाची बैठक
मराठा आरक्षणावर आज मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असून मराठा आरक्षणावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईत सहृयाद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमितीची बैठक होणार आहे.