एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, तब्येत खालवल्याने आंदोलनस्थळी वैदकीय पथक, तपासणी सुरु 

Manoj Jarange health Update: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आंतरवली सराटीमध्ये वैद्यकीय पथक दाखल झालं असून मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट आहे.

Manoj Jarange health Update: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या तब्येतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती हळू हळू खालावत असून सध्या उपोषणस्थळी वैद्यकीय पथक आले असून जरांगे यांची या पथकाकडून आरोग्य तपासणी (health Update) सुरु करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासह सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

राज्यात मराठा आरक्षण विषय तीव्र स्वरुप घेत असून जालन्यातील आंतरवली सराटी गावातून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये शाब्दिक चकमकी होत असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेसह सरकारवर निशाणा साधला जात असताना सरकारकडूनही जरांगेंच्या आंदोलनावर प्रत्यूत्तर दिले जात आहे.

मराठा समाजाच्या वतीने आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून सरकारला मराठा आरक्षणासह सगेसोयऱ्यांची मागणी घेऊन ७ ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचीही हाक त्यांनी दिली आहे. दरम्यान, आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यात जरांगे यांची प्रकृती हळू हळू खालावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे ठाम असून त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र आरक्षणाची डेडलाईन संपल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे, आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्याला समीकरण जुळवावे लागणार

एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण जुळवावं लागणार आहे असं मनोज जरांगे म्हणालेत. समीकरण जुळले नाही तर आपल्याला उमेदवार उभे करून जमणार नाही. जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं. मग पाडापाडी करावी लागेल असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.

हेही वाचा:

मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, धनंजय मुंडे म्हणाले, काही वेगळं आहे का अशी शंका आमच्या मनात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget