एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यवतमाळमध्ये अस्थीविसर्जन करुन परतताना भीषण अपघात; सहा ठार, 12 जखमी
दोन दिवसांपूर्वी निधन झालेल्या नातेवाईकाचं अस्थीविसर्जन करून परत येत असताना मालवाहू गाडीचा भीषण अपघात झाला. यात सहाजण ठार झाले आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील जोडमोहानजीक वाढोणा गावाजवळ ही घटना घडली.
यवतमाळ : अस्थीविसर्जन करुन परत येत असताना मालवाहू वाहनाची झाडाला धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना कळंब आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील जोडमोहानजीक वाढोणा गावाजवळ ही घटना घडली.
हा अपघात सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढोना खुर्द गावाजवळ झाला. जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यासाठी सर्व नातेवाईक कोटेश्वर येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान अस्ती विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे परत येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात कोसळली. या वाहनात एकूण 21 लोकं प्रवास करीत होते.
नागपूर-भंडारा मार्गावर लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू -
या भीषण अपघातात महादेव बावनकर(वय 53, रा. शेंदुरजनाघाट), किसन कळसकर(वय 55), महादेव चंदनकर (वय 58), वाहनचालक अमर आत्राम (वय 32)तिघेही राहणार जोडमोहा आणि गणेश चिंचाळकर (वय 52, रा. महागाव)हे पाच जण जागीच ठार झाले. तर एका मृतकाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. अपघातात इतर सहा जण गंभीर जखमी झालेत. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेने जोडमोहा येथे शोककळा पसरली आहे.
Nagpur Accident | लग्नाचं वऱ्याड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, 4 जणांचा मृत्यू | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement